मुंबई : विधानसभेसाठी मनसेकडून काल (दि.22) 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे जाहीर करण्यात आलेल्या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित ठाकरेंचं राजकारणात स्वागत आहे असे म्हणत ठाकरे गटाकडून या मतदारसंघात कडव्या लढतीसाठी उमेदवार दिलाच जाईल असे स्पष्ट केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊतांच्या चॅलेंजला अमित ठाकरेंनेही जशाच तशी प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut On Amit Raj Thackeray)
मोठी बातमी : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बाजी मारण्यासाठी अजितदादांसह 38 शिलेदार मैदानात
बिग फाईटसाठी उमेदवार देणारचं
राऊत म्हणाले की, जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर, तरुणांचं राजकारणात स्वागत करावं अशी आमची परंपरा आणि संस्कृती आहे. दादर-माहीम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधीच होणार नाही. त्यामुळे आता अमित राज ठाकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आदित्य ठाकरे मागच्यावेळच्या मताधिक्याने विजयी होणार
आदित्य ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना राऊत म्हणाले की, वरळीमध्ये आदित्य ठाकरे मागच्या इतक्याच मताधिकाने जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. वरळीची चिंता आम्हाला वाटत नाही किंवा महाराष्ट्रात असे अनेक मतदार संघ आहेत जिथे आम्ही खात्रीने सांगत आहो की आम्ही त्या जागा जिंकूच असा दावाही राऊतांनी केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी
माहीममध्ये शिंदेंकडून सदा सरवणकर मैदानात
एकनाथ शिंदेकडून काल (दि.22) जाहीर करण्यात आलेल्या ादीत माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात सरवणकर विरूद्ध अमित ठाकर यांच्यात लढत होणार असून, ठाकरे गटाकडून माहीमचे विभागप्रमुख आणि इच्छुक उमेदवार महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभेत माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा आला – अमित ठाकरे
अमित ठाकारेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज (दि.23) माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा अल्याचे सांगितले. मी लहान पणापासून या भागात वाढलोय, आम्हाला या मतदार संघातले विषय मला माहित आहे. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहे. त्यामुळे समोर कुणीही आलं तरी मी लढणार, अशी भूमिका अमित ठाकरेंनी जाहीर केली.
काटे, कलाटे की नखाते, शरद पवारांच्या मनात कोण? नानांनी सांगितला भेटीचा वृत्तांत
वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल
निवडून आल्यावर माहीम-दादरमधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मी मार्गी लावणार, असं अमित ठाकरेंनी म्हटल्यानंतर तुमच्या मतदारसंघालाचा लागून भाऊ आदित्य ठाकरे यांचा वरळीचा मतदारसंघही आहे. त्यावर आदित्य ठाकरे हो म्हटल्यावर वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल, असं विधान अमित ठाकरेंनी केले. त्यांच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.