मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान झाले. राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाले. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यावेळी नेकमी कुणाची सत्ता स्थापन झाली होती याबद्दल जाणून घेऊया.
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर
राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर बुधवारी मतदान पार पडले. गेल्या म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 65.02 टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक आहे. यापूर्वी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 71.69 टक्के मतदान झाले होते.
Voter Turnout – 65.02% in #Maharashtra and 68.45% in #Jharkhand as of 11:30
PM; surpasses voting in 2019 elections in both the states.Read the detailed PN here on this link : https://t.co/oqDpG1wIT5 #MaharashtraElection2024 #JharkhandElections2024 #ECI #Elections2024
— Election Commission of India (@ECISVEEP) November 20, 2024
लोकसभेला 61.39 टक्के मतदान
या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६१.३९ टक्के मतदान झाले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 61.4 टक्के
मतदान झाले होते. त्यानंतर आताच्या निवडणुकीत या टक्केवारील वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे श्रेय मुख्यत्वे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्या प्रचाराला जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४२.७१ टक्के मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती.
पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल
वाढलेली टक्केवारी सत्ता स्थापनेसाठी ठरणार गेम चेंजर
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 3.5 टक्क्यांनी वाढलेली मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रात कुणाची सत्ता स्थापन करणार यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे बोलले जात आहे. कारण 2019 मध्ये महाराष्ट्रात 8.85 कोटी मतदार होते, ज्यात 2024 मध्ये वाढ होऊन ही आकडेवारी 9.69 कोटी झाली आहे. त्यापैकी 5 कोटी पुरुष आणि 4.69 महिला मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार 4136 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 3771 पुरुष तर 363 महिला मतदार आहेत.
वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला?
विधानसभा निवडणुकीत वाढलेली मतदानाची टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होणार असा प्रश्न यानंतर उपस्थित केला जात असून, याचा सर्वाधिक फायदा सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, असे बोलले जात आहे. ज्या-ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे, हे खरे आहे. याचा फायदा भाजप आणि महायुती या दोघांना होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
Exit Poll : 2019 मध्ये किती खरे ठरले होते निवडणुकीचे अंदाज?, वाचा सविस्तर..
मविआला विजयाचा पूर्ण विश्वास
एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढल्यानंतर याचा फायदा महायुतीलाच होईल असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेदेखील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच सत्ता स्थापन करले असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मतदारांमध्ये उत्साह असून, महाराष्ट्रातील स्वाभिमानी नागरिक राज्याच्या हिताला प्राधान्य देणारे सरकार निवडून देतील. काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असे ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे निश्चित आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी येताच फडणवीस संघ कार्यालयात दाखल, मोहन भागवतांशी राजकीय खलबतं…
1995 मध्ये कुणाचे सरकार स्थापन झाले होते?
महाराष्ट्रात तब्बल 30 वर्षांनंतर मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी 1995 मध्ये 71.69 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होऊन मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. दोन टप्प्यात पार पडलेली ही निवडणूक 12 फेब्रुवारी आणि 9 मार्च 1995 रोजी पार पडली होती. तर, 13 मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अविभाजित शिवसेना आणि भाजपची युती झाली. मनोहर जोशी राज्याचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. यात काँग्रेसने 80, शिवसेनेने 73 आणि भाजपने 65 जागा जिंकल्या होत्या.