Shivajirao Kardile News : मी समोर येण्याची गरज नाही, जनताच निकालातून त्यांना उत्तर देणार असल्याचा हल्लाबोल महायुतीचे उमदेवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंवर केलायं. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारासाठी कर्डिलेंचा मतदारसंघात झंझावात दौरा सुरु आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजीमध्ये आज कर्डिलेंनी प्रचाररॅली काढली. यावेळी नागरिकांनी कर्डिलेंचं उत्साहात स्वागत करुन आशिर्वाद दिले आहेत.
जनतेकडून मला मिळणार प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालाची वाळू सरकली, सुनील शेळकेंचा हल्लाबोल
यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, मी दहा वर्षे मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय घेत नारळ वाढवत फोटो सेशन करण्याचे काम केले. त्यांनी आजही त्यांचा पाच वर्षांपूर्वी केलेला जाहिरनामा दाखवून त्यातील किती आश्वासने पूर्ण झाली हे उदाहरणासह दाखवून द्यावी. राहुरी शहराला स्मार्ट सिटी करणार, एमआयडीसी आणणार असा गवगवा करून त्यांनी मते मिळवली पण अडीच वर्षे मंत्रीपदी असूनही त्यांना काहीच करता आले नसल्याची टीका कर्डिलेंनी केलीयं.
तसेच सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमीपूजन केलेली पाणी योजना अडवून ती पूर्ण होऊ दिली नाही. ते मला समोर येऊन विकासकामांची चर्चा करण्याचे सांगतात. पण मी समोर येण्याची गरज नाही. त्यांना राहुरीतील जनताच निकालातून चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा हल्लाबोल कर्डिलेंनी केलायं. आमदाराने एमआयडीसी ऐवजी स्वतःच्या खाजगी साखर कारखाना चालवून ऊस उत्पादकांना तुटपुंजा दर देऊन त्यांना लुटण्याचे काम केले. मामा मोठा तालेवार असताना भाच्याला मंत्रीपद मिळूनही मतदारसंघात ठसा उमटवला आला नाही, असाही टोला कर्डिले यांनी तनपुरेंना लगावलायं.
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा; प्रचार संभांमधून नेत्यांचा थेट वार प्रतिवार
विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करीत जनतेची दिशाभूल…
सध्या विरोधी उमेदवार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांना संधी मिळाली, सरकारमध्ये मंत्रीही झाले. सहा खाती मिळाली. त्याचा मतदारसंघासाठी काय उपयोग झाला. नगरविकास खाते असताना राहुरी शहरात काहीच विकास झाला नाही. साधे बसस्थानकही यांना नवीन करता आले नाही. शहरात सर्वत्र बकाल अवस्था आहे. वाहतुकीची समस्या आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात तर ना मंत्री पोहोचले ना त्यांचे खाते पोहोचले. मंत्री म्हणून एका पत्रावर त्यांना गावांचा कायापालट करता आला असता. पण त्यांनी फक्त ठेकेदार पोसण्याचे काम केले. फक्त फोटो सेशन करायचे आणि कामाचा आव आणायचा एवढच त्यांनी केले. सडे, पाचगाव गावांची पाणी योजना मंजूर करून माझ्या कार्यकाळात कार्यारंभ आदेशही देण्यात आला. त्यातही खोडा घालून त्यांनी जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केलं असल्याची टीका कर्डिले यांनी केलीयं.