Download App

कार्यकर्ता भाजपाची खरी शक्ती, राज्यात पुन्हा महायुती सरकार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास

Ravindra Chavan : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा

  • Written By: Last Updated:

Ravindra Chavan : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यातच आज  मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या प्रचारार्थ भाजपाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ते बोलत होते.

या बैठकीत रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजप ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. त्यातच महाराष्ट्रात भाजपाला (BJP) शिवसेना, रा. काँ. पक्ष, रिपाई आणि इतर मित्रपक्षांची साथ लाभल्यामुळे भाजप – महायुतीच्या सरकारने राज्याला पुन्हा सर्वोच्च स्तरावर पोहोचवले आहे. ही वाटचाल अशीच निरंतर सुरू राहण्यासाठी राज्यात पुन्हा भाजप – महायुतीचे सरकार आले पाहिजे आणि येणारच. असं ते म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांना बुथ आणि मंडल प्रमुखांना महायुतीसाठी जोमाने काम करा असं देखील कार्यकर्त्यांशी या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाण म्हणाले.

या बैठकीला बेलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे, भाजपाचे नेते प्रसाद लाड, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजप – महायुतीचे इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तर ठाण्यातील वर्तकनगरमध्ये भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महायुती सरकारच्या काळात ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांना प्राधान्य देण्यात आलं. मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांचं मजबूत नेटवर्क उभारण्यावर भर देण्यात आला. यामुळे शहरांसोबतच शहरातील नागरिकांचीही प्रगती होत आहे. त्यामुळे या शहरांतील नागरिक पुन्हा एकदा महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

तसेच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे प्रगती आणि विकासाची ही गंगा अशीच वाहत राहावी, महायज्ञ यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

संग्राम जगतापांना माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा; सुजय विखेंचे आवाहन

या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रभारी दामू नाईक, कोकण मंडळ पर्यटन संघटनेचे मंत्री सतीश धोंड, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.

follow us