Download App

कोपरगावकरांना पाण्याचा शब्द दिला; अनेक अडचणीनंतरही तो पाळला ! चैताली काळे यांनी सभा गाजविली !

कोपरगाव शहरातील शिवाजी रोड येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.

  • Written By: Last Updated:

कोपरगाव: कोपरगाव (Kopergaon)शहराचा पाणीप्रश्न एवढा भीषण होता की, हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाला पाणी विकत आणून द्यावे लागत होते. ही परिस्थिती आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविल्यामुळे आता बदलली आहे. कोपरगाव शहराच्या (Kopargaon Assembly constituency) झालेल्या विकासातून यावर्षीची व्यावसायिकांची दिवाळी देखील जोरात झाली आहे. मतदारसंघातील जनतेचा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी विकासाची दिलेली वचने पूर्ण केली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासाचा विश्वास मतदानातून व्यक्त करा आणि आमदार आशुतोष काळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केले.

Bapusaheb Pathare : ‘तुतारी’च्या निनादात बापुसाहेब पठारेंचा स्वागत अन् औक्षण…

कोपरगाव शहरातील शिवाजी रोड येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दिलीप जोशी होते. चैताली काळे म्हणाल्या की, आमदार आशुतोष काळे यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्यामुळे या पाच वर्षात मतदारसंघासह कोपरगाव शहराच्या विकासात आमूलाग्र बदल झालाय. कोपरगाव शहराच्या जुन्या बाजारपेठेत पावसाळ्यात काही ठिकाणी जायचे असेल तर दूरवर पायी चिखलातून जावे लागत असे, आता मात्र सर्वत्र सुंदर रस्ते झाल्यामुळे कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. मागील काही वर्षांत पाणी प्रश्न व सोयी सुविधेचा अभाव असल्यामुळे खरेदीसाठी दुसऱ्या शहरात जाणाऱ्या नागरिकांचा खरेदीसाठी पुन्हा कोपरगाव शहराकडे ओघ वाढलाय. यावर्षीच्या दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या प्रचंड गर्दीवरून जाणवत होते. कोपरगाव शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच सर्वच प्रमुख रस्त्यांचा विकास झाला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोपरगाव शहराचा अनेक वर्षाचा पाणीप्रश्न दिलेल्या शब्दाप्रमाणे आमदार आशुतोष काळे यांनी सोडविला आहे.

महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणारच, रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना धडकी भरवणारा दावा

पाणीप्रश्न सोडविल्यामुळे महिला भगिनींची अडचण दूर होवून व्यवसायाला देखील अधिकची चालना मिळाली असली तरी पाच नंबरच्या साठवण तलावाचे काम सुरु करण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत अनंत अडचणींचा सामना आमदार आशुतोष काळे यांना करावा लागला आहे, याची जाणीव आपणा सर्वांना आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासाची परतफेड करण्यासाठी विकासाचा विश्वास मतदानातून व्यक्त करून आ. आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन चैताली काळे यांनी यावेळी केले. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव मतदारसंघातील सर्व मतदार सुज्ञ आहेत. काळे परिवाराकडे समाजकारणाची परंपरा आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील विकासाची अनेक कामे केली आहेत. आमदार आशुतोष काळे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देखील दिलेली आश्वासने पूर्ण करून कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविला आहे .आपल्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी व विधानसभेत आपले प्रश्न योग्य पद्धतीने मांडण्यासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे, असे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. दिलीप जोशी म्हणाले.

follow us