अहिल्यानगर : उर्जा विभागाचा मंञी असताना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. माञ विरोधक ट्रान्सफॉर्मर बसविले म्हणून टिका करतात. मंत्री होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडायचे नसतील मग तेथे काय गोट्या खेळायच्या का? असा संताप सवाल आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केला. भविष्यात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज कशी मिळेल, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे तनपुरेंनी सांगितलं.
आज शुक्रवारी सकाळपासून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा गुहा, गणेगाव, चिंचविहरे, कनगर, मल्हारवाडी, घोरपडवाडी, मोमीन आखाडा गावांत जन आर्शिवाद याञा निमित्ताने प्रचाराचा झंझावात दौरा झाला आहे. गावागावात वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत तनपुरे यांचे उत्सुर्फ स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच दत्तात्रय गाढे होते.
‘जय जय स्वामी समर्थ’… मालिकेने केला 1300 भागांचा टप्पा पार! जगभरातून मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद
कर्डिलेंनी दहा वर्षात कुठलेच भरीव काम केले नाही…
यावेळी बोलतांना तनपुरे म्हणाले की, या भागातील निळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असताना माजी आमदारांनी दहा वर्ष कुठलेही भरीव काम केले नाही. आम्ही काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत जलसंपदा मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याममुळं परिसरामध्ये निलवंडे धरणाच्या कालव्याचे पाणी पोहोचू शकले आहे. परिणामी, इथला शेतकरी देखील सुजलम-सुफलाम झाला आहे. येणाऱ्या काळात देखील विजेचे प्रश्नांसह मूलभूत प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही तनुरेंनी दिली.
फिर एक बार सुनील अण्णा मावळचे आमदार..?, भाजप पदाधिकारी शेळकेंच्या बाजूने…
आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसा वीज कशी मिळेल, यासाठी तसेच कुरणवाडी योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन, पाठचाऱ्या, जिल्हा परिषद आदींसह विविध कामांकरिता सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले आहे.
यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, बाबासाहेब सोनवने, रामदास बाचकर, गोरक नालकर, दत्तात्रय गाढे, सोन्याबापू उऱ्हे, सुयोग नालकर, अनिल घाडगे, नवनाथ मुसमाडे, भाऊसाहेब आडभाई, संकेत जाधव, सिराज इनामदार, मच्छिंद्र वरघुडे, भाऊसाहेब पटेकर, मच्छिंद्र वरघुडे, धनंजय बर्डे, राजेंद्र दिवे, किशोर दिवे, रावसाहेब जाधव, बन्सी जाधव, भाऊसाहेब दिवे, रघुनाथ गाढे, राजेंद्र आडभाई, संकेत जाधव, आदित्य घाडगे, बाळासाहेब भुजाडी आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.