Download App

आदित्य ठाकरेंविरुध्द CM शिंदेंची मोठी खेळी, वरळीतून मिलिंद देवरा रिंगणात…

CM शिंदेंनी आदित्य ठाकरेंची कोंडी करण्यासाठी मोठा डाव टाकला. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मैदानात उतरलं.

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhansabha Election) महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. ठाकरे गटाने 65 उमेदवारांची घोषणा करत आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) उमेदवारी दिली. तर आता शिंदेंनी आदित्य ठाकरेंची कोंडी करण्यासाठी मोठा डाव टाकला. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मैदानात उतरलं.

संजय राऊतांना मोठा दिलासा, मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती 

सध्या वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आहेत. आता पुन्हा त्यांना वरळीतून उमेदवारी झाली. त्यांनी काल (दि. 24 ऑक्टोबर) वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, यावेळी शिंदे गटाने त्यांना रोखण्याचं मोठं प्लॅनिंग केलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य यांनी अनेकदा शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हानही दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंनी देवरा यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मोठा डाव टाकला.

सोन्यात 6 कोटींची गुंतवणूक अन् 182 कोटी रुपयांचे कर्ज, मंगलप्रभात लोढांची संपत्ती जाणून घ्या 

मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, त्यांना वरळीतून आमदारकीसाठी मैदानात उतरलं. असून त्यांच्या विरोधात मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटानेही आपला उमेदवार उभा केल्याने वरळी विधानसभेत तिरंगी लढत निश्चित झाली आहे.

वरळीकरांना अनेक वर्ष न्यायाची प्रतिक्षा होती, मात्र, आता आम्ही आमचे व्हिजन मांडणार, अशी पोस्ट देवरा यांनी केली. मी वरळी आणि वरळीच्या जनतेला न्याय देऊ शकेन, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला. लवकरच वरळी मतदारसंघासाठी आमचे पुढील धोरण जाहीर करू, असं म्हणत देवरा यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले. स्वत: मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर आपल्या उमेदवारीची माहिती दिली आहे.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, मिलिंद देवरा वरळीतून नक्कीच विजयी होतील, त्यांच्या कामामुळे, त्यांच्या प्रतिमेमुळे ते वरळीतून जिंकू शकतात, असा मला विश्वास आहे. कारण ते यापूर्वी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत, असं शेलार म्हणाले.

follow us