Download App

‘नूर बेगम’च्या गायनप्रवासाची सुरेल झलक, ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!

Songs of Paradise चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ही कहाणी स्वप्नं, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक घेऊन आली आहे.

A melodious glimpse of ‘Noor Begum’s’ singing journey, the heartwarming trailer of ‘Songs of Paradise’ released : प्राईम व्हिडिओच्या ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ही कहाणी स्वप्नं, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक घेऊन आली आहे. ही फिल्म एक्सेल एंटरटेनमेंटने सादर केली असून दानिश रेंजू यांनी दिग्दर्शित केली आहे आणि शफत काझी व दानिश रेंजू यांनी निर्मिती केली आहे. ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’मध्ये जबरदस्त कलाकारांचा समावेश आहे – सबा आझाद, सोनी रझदान, झैन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारुक रैना, शिशिर शर्मा आणि लिलेट दुबे. ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ २९ ऑगस्ट रोजी भारतात तसेच जगभरातील २०० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडिओवर एक्सक्लुझिव्ह प्रीमियर होणार आहे.

नक्षलवाद्याच्या आयुष्यातील मानवी पैलू; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

भारताच्या सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राईम व्हिडिओने ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सबा आझाद आणि सोनी रझदान अभिनित ही कहाणी अतिशय हृदयस्पर्शी आहे. ही फिल्म पद्मश्री पुरस्कार विजेती काश्मिरी गायिका राज बेगम यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या संगीतप्रवासातून प्रेरित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक दानिश रेंजू यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून निरंजन अयंगार आणि सुनयना कचरू यांनीही लेखनात योगदान दिले आहे. ही फिल्म काश्मीरच्या पहिल्या महिला पार्श्वगायिकेला – ‘राज बेगम’ यांना वाहिलेली एक आदरांजली आहे, ज्या घाटीतील संगीतकारांसाठी एक मार्गदर्शक ठरल्या. चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट, अ‍ॅपल ट्री पिक्चर्स आणि रेंजू फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. यात असंख्य ताकदीचे कलाकार आहेत – सबा आझाद, सोनी रझदान, झैन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारुक रैना, शिशिर शर्मा आणि लिलेट दुबे.

भाजपने भाकरी फिरवली! अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, संजय सावकारे यांची उचलबांगडी……

ट्रेलरमध्ये ‘नूर बेगम’च्या जीवनाचा आणि त्यांच्या गायनप्रवासाचा सुरेल झलक पाहायला मिळतो, ज्यात सबा आझाद आणि सोनी रझदान यांनी दोन वेगवेगळ्या काळातली नूरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट धैर्य, सामाजिक बंधनं मोडण्याची जिद्द आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध यांची कहाणी आहे. नूर ही एक अत्यंत प्रतिभावान तरुण गायिका आहे, जी त्या काळात महिलांवर असलेल्या सामाजिक निर्बंधांचा सामना करत आपल्या स्वप्नांसाठी लढा देते. ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ ही तिच्या प्रेरणादायी संगीत प्रवासाला दिलेली एक आदरांजली आहे. अभय सोपोरी यांच्या संगीतात आणि मस्रत उन्न निसा यांच्या आवाजात या चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळते. चित्रपटात काश्मीरच्या समृद्ध संगीत परंपरेचं आणि भावनिक पार्श्वभूमीचं अत्यंत सुंदर दर्शन घडतं.

ब्रेकिंग! आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा; 5,590 कोटींचा घोटाळा…

सबा आझाद, जी तरुण नूर बेगमची भूमिका साकारत आहे, ती म्हणते : “राज बेगम यांच्यासारख्या दिग्गज गायिकेवर आधारित भूमिका करणे ही माझ्यासाठी एक वेगळीच अनुभूती होती. एक संगीतकार म्हणून मी विविध संगीत ऐकलं आहे, पण त्यांच्याबद्दल मला फारसं माहीत नव्हतं. या चित्रपटामुळे मला त्यांच्या जीवनप्रवासाची आणि त्यांच्या संगीताची खरी ओळख झाली.
ही फिल्म महिलांच्या धैर्याची आणि स्वातंत्र्याची गोष्ट सांगते. मला आतुरता आहे प्रेक्षकांनी ही कथा प्राईम व्हिडिओवर पाहण्याची – ही गोष्ट आहे काश्मीरच्या संगीताची आणि त्या स्त्रीची जिने हे शक्य केलं.”

‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित! 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

सोनी रझदान, जी वृद्ध नूर बेगमची भूमिका करत आहे, ती म्हणते : “‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ ही अशी कथा आहे की जी मी स्क्रिप्ट वाचताना लगेचच माझ्या मनात बसली. ही भूमिका करताना मला एका संघर्षमय, मेहनतीने भरलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आयुष्याचा अनुभव आला. ही कथा काश्मीरच्या संगीत परंपरेला एक आदरांजली आहे आणि राज बेगम यांच्या असामान्य जीवनाची खरी ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.”

follow us