Download App

69th National Film Awards: दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहीदा रेहमान झाल्या भावूक; म्हणाल्या…

69th National Film Awards: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडले आहे. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. (69th National Film Award) दिल्लीत सुरू असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात आलं. यावेळी वहीदा रेहमान (Waheeda Rehman) या भावूक झाल्याचे बघायला मिळाले आहेत.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिनेत्री वहीदा रेहमान म्हणाल्या की, “मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. आज मी इथे उभी आहे, याचं सर्व श्रेय माझ्या फिल्म इंडस्ट्रीला जात आहे. मेकअप आर्टिस्ट, हेअर आणि कॉस्टुम डिपार्टमेंटचे देखील काम अत्यंत महत्वाचे आहे. हा पुरस्कार मी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व डिपार्टमेंट्ससोबत शेअर करु इच्छिते. त्या सर्वांनी मला खूप प्रेम दिले आणि सपोर्ट केला आहे, असे बोलत असताना वहीदा रेहमान या भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

वहिदा रहमान या त्यांच्या काळामधील सुप्रसिद्ध नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी एक फूल चार काँटे, चाँदनी, दिल्ली 6, बीस साल बाद, गाइड, प्यासा, कागज के फूल आणि चौधरी का चांद हे असे लोकप्रिय सिनेमात उत्तम कामगिरी बजावली आहे. आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’मध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

69th National Award मध्ये सरदार उधम सिंहचा बोलबाला; ‘या’ 5 कॅटेगिरीमध्ये पुरस्कार प्राप्त

तसेच ‘त्यांना ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातील सुंदर भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित वहीदाजी यांनी भारतीय स्त्रीचे समर्पण, सामर्थ्य आणि वचनबद्धतेच्या उत्तम उदाहरण आहेत. एकीकडे संसदेत नारीशक्ती वंदन अधिनियम मंजूर होत असताना, त्यांना या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याऱ्यास्त्रीचा सन्मान आहे.’

Tags

follow us