Download App

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज होणार घोषणा

National Film Awards 2023: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज (24 ऑगस्ट) घोषणा होणार आहे. मागील वर्षभरातील सिनेमांमध्ये दमदार कामगिरी करणार्‍या विविध कलाकारांचा या चित्रपट सोहळ्यात सन्मान केला जातो. सार्‍या देशातून विविध भाषेतील सिनेमांचा यामध्ये समावेश असतो. दरम्यान संध्याकाळी 5 च्या सुमारास विजेत्यांची घोषणा सुरू होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून साऊथचे सिनेमा हे मोठ्या संख्येनं हिंदी सिनेमाना टक्कर देत असल्याचे बघायला मिळत आहेत. यंदा नायट्टू आणि मिन्नाल मुरली या दोन सिनेमानं अनेक श्रेणींमध्ये नामांकन असणार आहे. तसेच राजमोली यांचा आरआरआर हा सिनेमा देखील चांगलाच टक्कर देणार आहे. ऑस्कर अवॉर्ड जिंकलेले संगीतकार एम.एम. कीरवणी हे राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांमध्ये देखील बाजी मारणार का? ते बघावं लागणार आहे.

तसेच साऊथच्या सिनेमासोबत काही हिंदी सिनेमा देखील राष्ट्रीय सिनेमा पुरस्काराच्या शर्यतीमध्ये आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी तसेच रॉकेट्री हे सिनेमा राष्ट्रीय सिनेमा पुरस्काराच्या शर्यतीमध्ये आहे. राष्ट्रीय सिनेमा पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीतील पुरस्कारासाठी आलिया भट्ट आणि कंगना राणौत यांच्या नावाची जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

तसेच यंदा कोणत्या मराठी सिनेमाला राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार मिळणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागल्याचे बघायला मिळणार आहे. यंदा नायट्टू या सिनेमाला राष्ट्रीय सिनेमा पुरस्काराच्या काही श्रेणीमध्ये नामांकन देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मार्टिन प्राकट यांनी केले आहे. या सिनेमात जोजू जॉर्ज, कुंचको बोबन यांनी मुख्य भूमिका साकारली आहेत. नायट्टू हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. गेल्या वर्षी ’68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा नवी दिल्लीत पार पडला होता.

Sonu Sood: सोनू ठरला मसीहा! अभिनेत्याने घडवला एक तरुण पायलट

यामध्ये तान्हाजी, सूराराई पोट्ट्रू या सिनेमानी राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. आता यंदाच्या राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांची आज घोषणा असल्याने मनोरंजनसृष्टी तसेच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. गेल्या वर्षी 68 व्या राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार सोहळ्यामध्ये राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. तसेच गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाला देखील पुरस्कार देण्यात आला होता.

Tags

follow us