70th Hindi Filmfare Awards : दिग्गज कलाकार, चमकता रेड कार्पेट आणि ७० वा हिंदी फिल्मफेअर पुरस्कार नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला आणि याच खास सोहळ्यात ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदम यांची २ स्वप्न देखील पूर्ण झाली. अभिनयाच्या जोरावर छाया कदम यांनी जागतिक पातळीवर स्वतःची अनोखी ओळख संपादन करून बॉलिवुडमध्ये देखील त्यांचा कामाच कौतुक कायम होताना दिसतंय. सगळ्या भूमिका मधली त्यांची लापता लेडीज़ मधली भूमिका भाव खाऊन गेली आणि याच भूमिकेसाठी छाया कदम यांना बॉलिवुडचा किंग शाहरुख खान कडून फिल्मफेअर सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.
याबद्दल बोलताना छाया कदम (Chhaya Kadam) सांगतात ” लापता लेडीज़ सारख्या हिंदी चित्रपटासाठी हा पहिला वहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळणं ही भावना कमालीची आहे. जेव्हा मी पुरस्कार स्वीकारायला फिल्म फेअरच्या मंचावर गेले तेव्हा आज एक नाही दोन मोठी स्वप्नं पूर्ण झाली. बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) सरांकडून एक कडकडीत मिठी मिळणं आणि दुसरं ब्लॅक लेडी घरी घेऊन जाणं ! लापता लेडीज या चित्रपटाने मला अशी कहाणी सांगण्याची संधी दिली जी अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेली.
दिग्दर्शिका किरण राव, संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांनी माझ्या कामाला ज्या ऊबदारपणे स्वीकारलं त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. हा फिल्मफेअर पुरस्कार फक्त माझा नाही तो प्रत्येक त्या स्त्रीचा आहे जी सीमारेषांच्या पलीकडे स्वप्न पाहायची हिंमत करते” जागतिक पातळीवर जाऊन सगळ्यांचा लाडक्या छाया ताईनी आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आणि येणाऱ्या काळात देखील अजून उत्तम कथा, चित्रपट भूमिका घेऊन त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मोठी बातमी, विसेमळा गोळीबार प्रकरण, भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अटक