National Film Awards Ceremony : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे पार पडला. (National Film) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2024 सालातील चित्रपटांसाठी विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्याची ही सुरुवात असून, यापुढील सोहळे देशातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘आर्टिकल 370’ने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला, तर याच चित्रपटासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. ‘ब्रमायुगम’मधील अभिनयासाठी मम्मूट्टी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘अमरन’साठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’साठी रणदीप हुड्डाला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला.
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कल्कि 2898 एडी’ला सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक फीचर फिल्म, ‘भंगार’ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म आणि ‘राम-नामी’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘पुष्पा 2’, ‘स्त्री 2’, ‘भूल भुलैया 3’, ‘अमरन’ यांसह विविध भाषांतील चित्रपटांनी तांत्रिक आणि इतर श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले.
72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण विजेती यादी
दादासाहेब फाळके पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्कार: अनंत नाग
फीचर फिल्म पुरस्कार
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: आर्टिकल 370
सर्वोत्कृष्ट अभिनेता: मम्मूट्टी – ब्रमायुगम आणि कार्तिक आर्यन – चंदू चॅम्पियन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम – आर्टिकल 370
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: राजकुमार पेरियासामी – अमरन
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: संजय मिश्रा – भक्षक
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: सचाना नामिदास – महाराजा आणि रोपाश्री वरकाडी – मिथ्या
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: रणदीप हुड्डा – स्वातंत्र्य वीर सावरकर
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक फीचर फिल्म: कल्कि 2898 एडी
राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट: कॅप्टन मिलर
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: 35 – चिन्ना कथा काडू
लेखन आणि तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पटकथा: सुकुमार – पुष्पा 2 आणि योगेश देशपांडे – स्वर्गंधर्व सुधीर फडके
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: वेंकी अटलुरी – लकी भास्कर
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: शेहनाद जलाल – ब्रमायुगम
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: नितीन झिहानी चौधरी – कल्कि 2898 एडी
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन: अनल अरासू – महाराजा
सर्वोत्कृष्ट संकलन: आर. कलैवानन – अमरन
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना: मानस चौधरी – भूल भुलैया 3
सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइन: दीपाली नूर आणि शीतल शर्मा – पुष्पा 2
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: पी. रवी कुमार – कमिटी कुरोल्लू
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली – स्त्री 2
संगीत पुरस्कार
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन गाणी: शाश्वत सचदेव – आर्टिकल 370
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पार्श्वसंगीत: जी. व्ही. प्रकाश कुमार – अमरन
सर्वोत्कृष्ट गीतकार: मनोज मुंतशिर – मैदान
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक: अभय जोधपूरकर – नवसाची गौरी माझी, घरात गणपती
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: वैकॉम विजयलक्ष्मी – अंगु वाना कोनिलु, एआरएम
सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट
आसामी: जुईफूल
बंगाली: चलचित्र एखोन
गढवाली: ढोली
गुजराती: मारण
हिंदी: श्रीकांत
कन्नड: मिथ्या
कोंकणी: मोग आसुम
मल्याळम: फेमिनिची फातिमा
मणिपुरी: सुनीता
मराठी: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
ओडिया: लाहरी
तमिळ: रायन
तेलुगू: कमिटी कुरोल्लू
तुळू: इम्बू
नॉन-फीचर फिल्म पुरस्कार
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म: भंगार
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: रवी राज मुर्मू – अंगेन्
सर्वोत्कृष्ट माहितीपट: राम-नामी – भरतबाला गणपती
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट: पिपलांत्री – अ टेल ऑफ इको फेमिनिझम – सूरज कुमार
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म: टच्ड अॅज वॉटर – जोशी बेनेडिक्ट
सर्वोत्कृष्ट लघुपट: हमसफर – अभिजीत अरविंद दळवी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: आनंद एल. राय – स्टॅच्यू ऑफ युनिटी : एकता का प्रतीक
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: एडमंड रॅन्सन – लाइफ इन लूम
सर्वोत्कृष्ट संकलन: मनवीर जसरोतिया – एनडीए
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना: टी. एस. हरि हरा सुधन – ब्लू
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: शिवपाल सिंह कांग – परत 41°च्या मागावर
सर्वोत्कृष्ट निवेदक/व्हॉइस ओव्हर: सौंदर्या जयचंद्रन – लिटल प्लॅनेट : अ टेल ऑफ फ्रॉग्स
सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट: मेन निदा
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक पुनर्निर्मिती/संकलन चित्रपट: काकोरी
विशेष उल्लेख – नॉन-फीचर फिल्म
भद्र-काली नाटकम – आनंद ज्योती
चोला डोरा और सुई – जयमिन मोदी आणि लोकेश घई
चित्रपटावरील लेखन
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: संजीव श्रीवास्तव – हिंदी
