Download App

Online Fraud: ‘या’ अभिनेत्रीविरोधात ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Online Fraud : ऑनलाईनद्वारे आर्थिक फसवणुकीचा प्रमाण सध्या वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री सोनारिका भदोरिया (Sonarika Bhadoria) हिने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) स्टोरी ठेवून इशिका जैस्वाल हिची (Social media) जाहिरात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जाहिरातीद्वारे तिनं इशिकाच्या पेजवर जाऊन पैशांची गुंतवणूक करा आणि खूप सारे पैसे मिळवा, असं यावेळी तिने सांगितलं आहे. हा एक मोठा घोटाळा आहे.


याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी अभिनेत्री सोनारिका भदोरिया आणि इशिका जैस्वाल या दोघी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहू नगर येथील २९ वर्षीय परमेश मैत्री याने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली शाहू नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. परमेश यांचा स्पष्ट मत आहे की, त्यांनी अभिनेत्री सोनारिका बदोरियाची ऍड बघून हे इन्व्हेस्टमेंट केल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे. परंतु त्यांची यामध्ये फसवणूक झाल्याने गुन्हा नोंद केला आहे.

सोनारिका भदोरिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी तेलुगु, हिंदी आणि तमिळ सिनेमामध्ये कायम बघायला मिळत असते. देवों के देव…महादेव या सिरियलमधील देवी पार्वती/आदी शक्तीच्या मुख्य भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. सोनारिकाने इन्स्टाग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगबद्दल स्टेटस ठेवले होता. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोनारिका भदोरिया ही सध्या सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या हटक्या लूक्समधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट चाहत्यांचे कायम लक्ष वेधत असल्याचे बघायला मिळत असते. तसेच अनेक नेटकरी तिच्या पोस्टवर लाइक आणि कमेंट करत असतात.

Jawan: किंग खानच्या जवानमधील सुमित अरोराच्या संवादाने घातली प्रेक्षकांना भुरळ!

तसेच तक्रारदार परमेश मैत्री यांनी अभिनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उत्तर मिळालं नसल्यचे त्याने यावेळी सांगितले आहे. यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे. या अभिनेत्रीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वापरण्यात आला आहे का? तसेच इतर गोष्टी तपासामध्ये लवकरच स्पष्ट होणार आहेत. परंतु ही अभिनेत्रीची जाहिरात बघून किती जणांची फसवणूक झाली आहे? हे बघणं आता नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही +अशा ऑनलाइन ट्रेडिंग किंवा सेलिब्रिटी ॲड बघून पैशाचे व्यवहार आजिबात नका करू, असे आदेश यावेळी दिला आहे.

Tags

follow us