‘प्रेमायण’ आणि ‘प्लस मायनस 2’ मधून नव्या टॅलेंटची नवी झेप! STAGE OTT चा होतकरू क्रिएटर्सना घडवण्याचा पुढाकार!

ग्रामीण महाराष्ट्रातील सत्यघटनेवर तरल प्रेमकथेच्या माध्यमातून नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, प्रेम, प्रतिष्ठा आणि सूड यांचे कथाविश्व उलगडले.

Untitled Design   2026 10 23T170936.644

Untitled Design 2026 10 23T170936.644

A new leap for new talent through ‘Premayan’ and ‘Plus Minus 2’ : मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या स्टेज ओटीटी या व्यासपीठावर आरा मल्टिमीडियाची निर्मिती असलेली ‘प्रेमायण’ ही वेबसिरीज 16 ऑक्टोबर 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या वेबसिरीज मधून ग्रामीण महाराष्ट्रातील सत्यघटनेवर आधारित तरल प्रेमकथेच्या माध्यमातून नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, प्रेम, प्रतिष्ठा आणि सूड यांचे अनोखे कथाविश्व उलगडले आहे. वेबसिरीजची निर्मिती नितीन शिर्के आणि भीमराव मुडे यांनी केली आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत स्टेज ओटीटीच्या भविष्यातील योजना, नव्या क्रिएटर्सना संधी देण्याचा दृष्टिकोन आणि ‘प्रेमायण’च्या निर्मिती प्रक्रियेविषयी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

आज ओटीटी क्षेत्रात अनेक नवी व्यासपीठे उदयास येत असताना, नव्या आणि होतकरू कलाकारांना,लेखकांना व क्रिएटर्सना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी,हा स्टेज ओटीटीचा महत्त्वाचा प्रयत्न आहे. केवळ प्रस्थापित नावांवर अवलंबून न राहता, नव्या क्रिएटर्सवर विश्वास ठेवून खेड्यापाड्यांत दडलेल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्टेज ओटीटी कटिबद्ध आहे. याविषयी बोलताना स्टेज ओटीटी मराठीचे कंटेंट आणि कल्चर हेड तसेच ‘प्रेमायण’चे क्रिएटर राजेश पाठक म्हणाले, “आज अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांसमोर येत आहेत. अशा वेळी नव्या आणि होतकरू क्रिएटर्सना संधी देणं,त्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवणं आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळवून देणं, ही आमची भूमिका आहे. दर महिन्याला 50 चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.‘प्रेमायण’सोबतच आरा मल्टिमीडियाची ‘प्लस मायनस २’ या नव्या वेबसीरिजची घोषणा ही यावेळी करण्यात आली असून, ही सीरिज 30 ऑक्टोबरपासून स्टेज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका तरल प्रेमकथेचा भावस्पर्शी प्रवास यात अनुभवायला मिळणार आहे.

पार्थ पवारांच्या अडचणींत वाढ?, मुंढवा जमीन प्रकरणात मोठी घडामोड, सहकाऱ्यांना नोटीसा

‘प्रेमायण’ विषयी बोलताना ‘प्रेमायण’चे क्रिएटर दिग्दर्शक भीमराव मुडे म्हणाले, “राजेश पाठक सर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नव्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनामुळे ‘प्रेमायण’ सारख्या वेगळ्या कलाकृतीशी जोडले जाण्याची संधी मिळाली. नव्या क्रिएटर्सना विश्वासाने संधी आणि त्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळालं, तर उत्तम कलाकृती नक्कीच घडू शकतात. संपूर्ण टीमला सोबत घेऊन प्रत्येकाच्या कौशल्याला वाव देत पुढे जाणं महत्त्वाचं आहे. अशा प्रयत्नांतूनच नवे कलाकार आणि क्रिएटर्स घडतील, असा मला विश्वास आहे.”

वेबसिरीजचे दिग्दर्शक राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी सांगितले, ‘प्रेमायण’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर एक वेगळा विषय आणि कथा मांडणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव आणि मानवी नात्यांमधील गुंतागुंत यांचं चित्रण करताना प्रत्येक पात्राला स्वतःची ओळख आणि भावनिक खोली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा वेगळा अनुभव प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

‘प्रेमायण’च्या संगीताविषयी बोलताना संगीतकार रोहन-रोहन म्हणाले, “या वेबसिरीजच्या संगीताची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली, ही आमच्यासाठी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कथानकातील भावना,पात्रांमधील नातेसंबंध आणि प्रसंगांची तीव्रता संगीताच्यामाध्यमातून अधिक प्रभावीपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गायक रोहन प्रधान, शैली बिडवाईकर, भूमी प्रधान यांनी यातील गाणी गायली आहेत. ‘प्रेमायण’च्या कथेला साजेसं आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं संगीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं हे काम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

Exit mobile version