A. R. Rahman यांचा शो बंद पाडला; पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांना सुनावले

A. R. Rahman : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान (a r rahman) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा दणका दिला आहे. रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असतानाच पुणे पोलिसांनी त्यांचा शो बंद पाडला आहे. यामुळे रहमान यांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांचा शो बंद (Show off) पाडलाच, […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T130024.372

A. R. Rahman

A. R. Rahman : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान (a r rahman) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा दणका दिला आहे. रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असतानाच पुणे पोलिसांनी त्यांचा शो बंद पाडला आहे. यामुळे रहमान यांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांचा शो बंद (Show off) पाडलाच, पण रहमान यांना स्टेजवर जाऊन खडेबोल सुनावले आहे. त्यामुळे रहमान यांना आपलं बोजाबिस्तरा आवरावं लागलं.

पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात रविवारी म्हणजे काल सायंकाळी प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो होता. या शोचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. रहमान येणार म्हटल्यावर त्याचे हजारो चाहते या शोला उपस्थिती लावली होती. इतकेच नाही तर पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते.


परंतु रात्रीचे १० वाजल्यानंतर देखील कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पुणे पोलिसांनी रहमान यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. पुणे पोलिसांनी चक्क स्टेजवर जाऊन कार्यक्रम बंद पाडला आहे. दरम्यान पुणे शहरात झालेल्या या कार्यक्रमानंतर पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. राजा बहादुर मिल परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

हा परिसरामध्ये सायलेंट झोन असताना देखील पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल आता विचारला जात आहे. या कार्यक्रमामुळे पुणे स्टेशन आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेकांना मनस्ताप झाला. यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version