A special conversation centered around ‘Adkitta’ : 1. तुम्हाला Adkittaचा भाग होण्यासाठी नेमकं काय आकर्षित केलं?
वरवर पाहता ही एक अगदी साधी वाटणारी कथा आहे, पण ती प्रेक्षकांना रोजच्या आयुष्यातील गुंतागुंतीतून एका प्रवासावर घेऊन जाते. कच्च्या भावनांना आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंना कोणताही आडपडदा न ठेवता ती समोर आणते.
2. मंगळ आणि अर्जुनचं नातं हळूहळू केअरटेकर आणि मुलाच्या नात्यापलीकडे जातं. आजच्या जगात, जेव्हा काम करणारे पालक मोठ्या प्रमाणावर केअरगिव्हर्सवर अवलंबून असतात, तेव्हा एखादा केअरटेकर मुलाची प्राथमिक काळजी घेणारी व्यक्ती बनतो आणि त्याच्याशी एक घट्ट भावनिक नातं निर्माण होतं, अशा परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता?
मुलाच्या विकासात केअरगिव्हर्सची भूमिका खूप महत्त्वाची असते, मग ते कुटुंबातील सदस्य असोत किंवा केअरटेकर. ते पालकांचं आयुष्य अधिक सोपं करतात आणि मुलासोबत त्यांचं एक खास नातं निर्माण होणार आहे, हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे. त्यांनी आपली जागा घेतली आहे अशी भीती बाळगण्याऐवजी, तुमच्या मुलावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांच्या दोघांमधील नात्याचं स्वागत करायला हवं.
दहीहंडीत अश्लील नृत्य करणं भोवलं, निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा दाखल
3. जेव्हा एखाद्या मुलाचं त्याच्या केअरटेकरसोबत घट्ट नातं निर्माण होतं, तेव्हा कधी कधी पालकांना असुरक्षित वाटू शकतं किंवा मुलाच्या आयुष्यातील आपली जागा गमावण्याची भीती वाटू शकते. तुम्हाला वाटतं का की अशा भावना स्वाभाविक आहेत आणि पालकांनी त्यांचा निरोगी पद्धतीने सामना कसा करावा?
अर्थात, या भावना स्वाभाविक आहेत, किंबहुना अपरिहार्य आहेत! आज काम करणाऱ्या पालकांमध्ये अपराधीपणाची भावना सामान्य आहे. पण तुम्ही तुमच्या मुलासाठी जे सर्वोत्तम आहे तेच करत आहात, याची स्वतःला आठवण करून देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही आणि केअरगिव्हर्स तुमच्यासाठी ही जबाबदारी सांभाळत आहात. त्यांच्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागल्याने, तुमच्या मुलासोबत त्यांचं असलेलं नातं ही एक सुंदर गोष्ट आहे, धोका नाही, असं पाहण्यास मदत होऊ शकते.
4. Adkittaमधील परिस्थिती आजच्या काम करणाऱ्या पालकांसाठी विशेषतः समर्पक आहे, जे आपल्या करिअरसोबत मुलांसाठीही वेळ देण्याचा सतत प्रयत्न करत असतात. व्यस्त वेळापत्रक असूनही पालकांनी मुलांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले राहण्यासाठी काय करायला हवं, असं तुम्हाला वाटतं?
हे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे हे लक्षात घेऊन सांगायचं झालं, तर पालकत्वाकडे जाण्याचा निर्णय हा नियोजनपूर्वक घेतलेला असावा. पालक म्हणून वेळेची विभागणी करणं आणि जबाबदाऱ्या एकमेकांमध्ये वाटून घेणं, मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यास मदत करू शकतं. वेळोवेळी मुलाशी संवाद साधणं, त्याला नेमकं काय हवं आहे हे समजून घेण्यास मदत करू शकतं.
