हिमाचल प्रदेशातील प्राचीन देवी मंदिरांच्या शतकानुशतकांच्या गाथांचा उलगडा; Times Music Spiritual ची विशेष डॉक्युमेंटरी सीरिज

12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या या मालिकेतून प्रेक्षकांना हिमाचल प्रदेशच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा अनुभव घेता येणार आहे.

Untitled Design   2026 10 12T142726.476

Untitled Design 2026 10 12T142726.476

A special documentary series by Times Music Spiritual : काही कथा प्रार्थनांमधून ऐकायला मिळतात, पिढ्यान्‌पिढ्या पुढे जातात आणि एखाद्या भूमीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात. याच समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देण्यासाठी या नवरात्रीत Times Music Spiritual तर्फे ‘दिव्य दर्शन’ ही नवीन डॉक्युमेंटरी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दहा भागांच्या विशेष मालिकेतून हिमाचल प्रदेशातील दहा शक्तिपीठांची सफर घडवण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या या मालिकेतून प्रेक्षकांना हिमाचल प्रदेशच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा अनुभव घेता येणार आहे.

‘दिव्य दर्शन’ ही निवेदकाच्या माध्यमातून सादर होणारी सिनेमॅटिक शैलीतील माहितीपट मालिका आहे. या मालिकेत प्राचीन देवी मंदिरांशी संबंधित अनेकांना अपरिचित असलेल्या कथा, शतकानुशतके जपल्या गेलेल्या परंपरा आणि मंदिरांचे ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व उलगडण्यात येणार आहे. मंदिरांचे पुजारी, स्थानिक इतिहासकार आणि संशोधक यांच्याशी संवाद साधून या पवित्र स्थळांचा इतिहास आणि त्यांच्याशी निगडित श्रद्धा प्रेक्षकांसमोर मांडल्या जाणार आहेत.

या मालिकेच्या निर्मितीसाठी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच हिमाचल प्रदेश सरकारच्या भाषा, कला आणि संस्कृती विभागाचे सहकार्य, मार्गदर्शन आणि ज्ञानाचे आदानप्रदानही या उपक्रमासाठी महत्त्वाचे ठरले आहे. हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री म्हणाले, “हिमाचल प्रदेशातील प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी निगडित कालातीत परंपरा हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत.

ज्ञानेश कुमारांचा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण… राहुल गांधींचा थेट इशारा

‘दिव्य दर्शन’च्या माध्यमातून या पवित्र स्थळांची माहिती व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याच्या आणि राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नाबद्दल मी Times Music Spiritual चे कौतुक करतो.” Times Music चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ठाकूर म्हणाले, “भारतातील मंदिरांशी संबंधित कथा या केवळ मंदिरांच्या चार भिंतींपुरत्या मर्यादित नाहीत. त्यामध्ये शतकानुशतकांची श्रद्धा, इतिहास आणि परंपरा सामावलेल्या आहेत. ‘दिव्य दर्शन’च्या माध्यमातून अर्थपूर्ण आणि सविस्तर कथाकथनाद्वारे या अनमोल गाथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हा आमचा उद्देश आहे.”

‘दिव्य दर्शन’ ही डॉक्युमेंटरी सीरिज 12 ऑक्टोबरपासून Times Music Spiritual च्या YouTube चॅनेलवर पाहता येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशातील प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Exit mobile version