Download App

दोहात अभिनेता अपारशक्ती खुराना आणि डेव्हिड बेकहॅम यांची खास भेट

Aparshakti Khurana : एक क्रीडाप्रेमी म्हणून अभिनेता अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) हा सगळ्यांना माहीत आहे. कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर (Akbar Al Baker) यांना भेटल्यानंतर त्यांची दोहा येथे फॉर्म्युला 1 कतार एअरवेज प्रायोजित कतार ग्रांप्री दरम्यान फुटबॉल दिग्गज डेव्हिड बेकहॅमशी अनपेक्षित भेट झाली. ज्युबिली फेम अभिनेत्याने फुटबॉल लीजेंडसह त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

अपारशक्ती आणि या दोन दिग्गज व्यक्तीच्या भेटी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरल्या. अपारशक्तीचे आगामी प्रकल्प “स्त्री 2” आणि अॅप्लाज एंटरटेनमेंटसह “फाइंडिंग राम” हा बायोपिक नक्कीच त्यांच अष्टपैलुत्व दर्शवेल तर अतुल सबरवाल दिग्दर्शित “बर्लिन” या त्यांच्या अन्य चित्रपटाने भारतीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये छाप पाडली आहे. लॉस एंजेलिसमध्ये त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं.

Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापतांच्या छावणीवर लष्कराचा हवाई हल्ला, 29 जणांचा मृत्यू

Tags

follow us

वेब स्टोरीज