‘आम्ही गोंधळी’च्या तालावर नवरात्र मंडळांत रंगला भक्तीचा जागर!

अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारे ‘आम्ही गोंधळी’ हे खास नवरात्री गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गीताला श्रोत्यांची पसंती मिळत आहे.

Untitled Design   2026 10 16T194028.595

Untitled Design 2026 10 16T194028.595

A spirit of devotion permeates Navaratri celebrations : नवरात्रीचा उत्साह, आई भवानीचा जागर आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळाचा दमदार ठेका… अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारे ‘आम्ही गोंधळी’ हे खास नवरात्री गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गीताला श्रोत्यांची पसंती मिळत आहे. श्रद्धा मोहिते यांच्या दमदार आणि भावपूर्ण आवाजातील या गीताने भक्ती आणि उत्साहाचा सुंदर संगम साधला आहे. यूट्यूबसह विविध व्हिडिओ आणि ऑडिओ प्लॅटफॉर्मवर गीताला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता मुंबईतील विविध नवरात्र मंडळांमध्येही या गीताचा नाद घुमू लागला आहे.

अदिती म्युझिकचे निर्माते विजय शिंदे यांच्या पुढाकारातून हे गीत श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. काही कलाकारांनी मुंबईतील विविध नवरात्र मंडळांना भेट देत मंडळांच्या मंचावर देवीच्या साक्षीने ‘आम्ही गोंधळी’ या गीतावर नृत्य सादर केले. ऑनलाइन माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या या गीताला प्रत्यक्ष सादरीकरणाची जोड मिळाल्याने हे गीत जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचे मोठे पाऊल, चौकशी आयोग अधिकृतपणे स्थापन

‘आम्ही गोंधळी’ या गीताला शशांक कोंडविलकर यांचे शब्द लाभले असून, गणेश सुर्वे यांनी संगीत दिग्दर्शनासह संगीत निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अवि बी पायाळ यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची व्हिडीओ निर्मिती मोरया मोशन पिक्चरने केली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळाचा अस्सल बाज जपत आधुनिक संगीताची जोड देण्यात आल्याने गीतातील भक्तिभाव अधिक खुलून आला आहे. आई भवानीच्या जागराचा जोश, तालबद्ध संगीत आणि श्रद्धा मोहिते यांच्या आवाजातील ऊर्जा यामुळे हे गीत नवरात्रीच्या उत्सवात विशेष रंग भरत आहे.

मोठी बातमी; सतीश वाघोलेंकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

या गीतविषयी दिग्दर्शक गणेश सुर्वे म्हणाले, “नवरात्री हा आपल्या सर्वांसाठी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. ‘आम्ही गोंधळी’ या गीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळाची ऊर्जा आणि आई भवानीप्रती असलेली श्रद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे गीत केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न राहाता, त्याचा आनंद लोकांना प्रत्यक्ष अनुभवता यावा, त्यांनी त्याच्या ठेक्यावर सहभागी व्हावे आणि भक्तिमय वातावरणात रमून जावे, हीच आमची भावना आहे.’’

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रतिसादापासून नवरात्र मंडळांतील उत्स्फूर्त दाद असा ‘आम्ही गोंधळी’चा प्रवास लक्षवेधी ठरत आहे. गीताच्या माध्यमातून पारंपरिक लोककलेचा वारसा जपत भक्तीचा जागर अधिक व्यापक करण्याचा अदिती म्युझिकचा हा प्रयत्न नवरात्रीच्या उत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे.

Exit mobile version