A unique blend of Spider-Man and Allu Arjun : जगभरातील प्रेक्षकांच्या आवडत्या सुपरहिरो स्पायडर-मॅनच्या नव्या चित्रपट ‘स्पायडर-मॅन : ब्रँड न्यू डे’ला तेलुगू राज्यांमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त हैदराबादमधील अल्लू सिनेमाज येथे भव्य प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रीमियरला अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह उपस्थित राहिल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भारतातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक डॉल्बी सिनेमागृहांपैकी एक असलेल्या अल्लू सिनेमाजमध्ये झालेल्या या प्रीमियरला अल्लू अर्जुन, त्यांची पत्नी स्नेहा रेड्डी आणि दोन्ही मुले उपस्थित होती.
त्यामुळे हा कार्यक्रम एका खास कौटुंबिक चित्रपटसोहळ्यात परिवर्तित झाला. या भव्य प्रीमियरला अल्लू अरविंद, अल्लू सिरीश, बनी वास यांच्यासह दिग्दर्शक चंदू मोंडेती, साई राजेश, हरीश शंकर आणि बोयापती श्रीनू यांनीही हजेरी लावली. अभिनेत्री राश्या गोरक, मिथ्री मूव्ही मेकर्सचे निर्माता रवी, हारिका अँड हासिनी क्रिएशन्सचे निर्माता चिन्ना बाबू तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांचीही उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.
सिस्पे घोटाळ्यातील आरोपींचा दुबई ते फिजीपर्यंत पाठलाग; खासदार निलेश लंके यांचा मोठा दावा
हैदराबादमध्ये झालेल्या या तारांकित प्रीमियरमुळे *‘स्पायडर-मॅन : ब्रँड न्यू डे’*बाबत असलेली उत्सुकता आणि चाहत्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. विशेषतः तेलुगू प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू असून तिकीट खिडकीवरही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्पायडर-मॅन मालिकेतील या नव्या अध्यायाने प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चा निर्माण केली होती. आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम असून सोशल मीडियावर अल्लू अर्जुन आणि स्पायडर-मॅन यांचा हा अनोखा संगम मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
‘स्पायडर-मॅन : ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट सध्या इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
