“मालिकेत नव्हतीच ती व्यक्ती…” – ‘लक्ष्य’ वादावर आदेश बांदेकरांचे दमदार प्रत्युत्तर…

Aadesh Bandekar मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता दिगंबर नाईक आणि निर्माता-अभिनेता आदेश बांदेकर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे.

Aadesh Bandekar

Aadesh Bandekar

Aadesh Bandekar and Digambar Naik Clashes on Marathi Lakshya Serial : मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता दिगंबर नाईक आणि निर्माता-अभिनेता आदेश बांदेकर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. एका मुलाखतीत दिगंबर नाईक यांनी ‘लक्ष्य’ मालिकेतून आपल्याला अचानक बाहेर काढण्यात आल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यानंतर आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले आदेश बांदेकर?

यावर बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, एखाद्या मालिकेत जी व्यक्ती कधीच नव्हती, तिला त्या मालिकेतून काढलं असं कसं म्हणता येईल? त्यांनी या आरोपांवर आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, ‘लक्ष्य’ मालिकेच्या अनेक भागांमध्ये संबंधित व्यक्ती कधीच सहभागी नव्हती. तसेच मालवणी कलाकारांना संधी दिली जात नाही, या आरोपालाही बांदेकरांनी ठाम उत्तर दिलं.

महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी’चा जादू; सर्वाधिक पाहिला जाणारा वास्तव कार्यक्रम ठरला!

त्यांनी ‘लक्ष्य’मधील कमलेश सावंतपासून ते ‘नांदा सौख्यभरे’मधील ऋतुजा बागवे आणि रागिनी सावंत, तसेच ‘शाब्बास सुनबाई’मधील कलाकारांची उदाहरणं देत सांगितलं की, अनेक मालवणी कलाकारांनी मराठी इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे. मी स्वतः कुडाळचा मालवणी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. असंही त्यांनी नमूद केलं. वादावर प्रतिक्रिया देताना बांदेकरांनी संयमित पण ठाम भूमिका घेतली. …एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटं स्वतःकडे असतात. त्यामुळे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, त्यांनी कलाकारांनी वादाऐवजी कामावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं.

दिगंबर नाईक नेमकं काय म्हणाले होते?

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिगंबर नाईक यांनी म्हटलं होतं की, ‘वस्त्रहरण’ नाटकानंतरच त्यांना मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलं गेलं. आदेश बांदेकर यांनी त्यांना रात्री उशिरा ‘लक्ष्य’ मालिकेतून काढलं मालवणी निर्मात्यालाच मालवणी माणूस नको असतो. असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, चॅनेल हेडला त्यांच्या कॉमिक इमेजमुळे सिरीयस भूमिकेबाबत शंका होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाद वाढणार की थांबणार?

या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी इंडस्ट्रीत ‘मालवणी विरुद्ध मुख्य प्रवाह’ असा नवीन चर्चेचा मुद्दा समोर आला आहे. आता या वादावर पुढे कोणती प्रतिक्रिया येते आणि हा मुद्दा किती वाढतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version