Aamir Khan dating Gauri Spratt, friend of 25 years : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान चक्क प्रेमात पडलाय. खरं वाटत नाही ना.. पण विश्वास ठेवावाच लागेल. कारण आमिरनेच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आमीर एका खास व्यक्तीला डेट करून ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे याचा खुलासा आमिर खानने केला आहे. मुंबईत अभिनेता आमीर खानच्या वाढदिवसाचं जंगी सेलीब्रेशन झालं. यावेळी मीडियाशी गप्पा मारताना आमिरने खास माहिती शेअर केली.
कोण आहे आमिर डेट करत असलेली गौरी?
अभिनेता आमिरच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी आहे. दोघेही मागील 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मागील एक वर्षापासून आमीर गौरीला डेट करत आहे. खरंतर गौरी बंगळुरूची राहणारी आहे. सध्या ती आमीर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे. अनेक ठिकाणी दोघे सोबतच स्पॉट झाले आहेत. विशेष म्हणजे या गौरीला एक मुलगा देखील आहे. या मुलाचं वय सहा वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. गौरीबद्दल सांगायचं झालं तर ती तमिळ आणि आयरिश वंशाची आहे तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते.
पाकिस्तान पुन्हा हादरला! ट्रेन अपहरणानंतर सैन्य ठिकाणांवर आत्मघाती हल्ला; अनेकांचा मृत्यू
आज आमिरने त्याचा 60 वाढदिवस माध्यमं आणि पापाराझींसोबत साजरा केला. त्यावेळी त्याने आपल्या आयुष्यात एक खास व्यक्ती आल्याचं जाहीर केलं. यावेळी त्याने सांगितलं की, तो आणि गौरी मागील एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असून हे नाते त्याच्यासाठी खूप खास आहे. इतकेच नव्हे, तर आमिरने गौरीची ओळख सलमान खान, शाहरुख खान आणि आपल्या कुटुंबीयांनाही करून दिली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गौरी आमिरची 25 वर्षांपासूनची मैत्रीण जरी असली तरी तिने गौरीने आमिरचे फक्त दंगल आणि लगान हेच चित्रपट पाहिले आहेत.
आमिर खान याआधी दोन वेळा विवाहबद्ध झाला होता. त्याचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्तासोबत झाले होते. या विवाहातून त्यांना दोन मुले – जुनैद खान आणि आयरा खान आहेत. मात्र, २००२ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता, पुन्हा एकदा आमिरच्या या नवीन नात्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.