Download App

Aapan Yana Pahilat Ka: ‘आपण यांना पाहिलंत का?’ धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

Aapan Yana Pahilat Ka: सध्या रंगभूमीवर काही नाटकं धुमाकूळ घालत आहेत. काही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत तर काहींना प्रेक्षकांच्या टीकांचे वार सहन करावे लागत आहेत. (Marathi drama) प्रेक्षकांसाठी खुशखबर म्हणजे या यादीत लवकरच अजून काही नाटकं सामील होणार आहेत. (Social media) व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने नवनवीन लेखन दिग्दर्शन पहायला मिळते.

यंदाच्या वर्षीही काही नवीन तर काही गाजलेली जुनी नाटकं पुन्हा नव्याने व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणार आहेत.’आपण यांना पाहिलंत का?’ नाटकं लवकरच रंगभूमीवर दिसणार आहेत. (Coming Soon) ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे आणि आता ‘आपण यांना पाहिलंत का?’ (Aapan Yana Pahilat Ka) हे नवं खुसखुशीत नाटक ते लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहे.

या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी (Sushil Swamy) यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षे सोबत काढल्यावर नवरा बायको नकळतपणे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात. ते सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत असते.

Rajkumar Rao च्या घरी झालं पर्यावरण पूरक बाप्पांचं आगमन!

ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्यां व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झालाले आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. त्यातच पती-पत्नी, नातेसंबंध हा विषय प्रत्येक काळात कालसुसंगत असतो. त्यामुळे ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकात आता काय धमाल अनुभवायला मिळणार याची उत्सुकता आहे.

Tags

follow us