Aasa Me Ashi Me : मराठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा अमोल शेटगे दिग्दर्शित, सचिन नाहर आणि अमोग मलाविया निर्मित ‘आसा मी अशी मी’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लंडनच्या मोहक लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर आणि भावनिक वळणांनी सजलेली आहे. ‘आसा मी अशी मी’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून या ट्रेलर ने एका प्रेमकथेला आंतरराष्ट्रीय उंची दिली आहे.
यूकेमधील भव्य लोकेशन्स, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, आलिशान प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि मनाला भिडणारा रोमँस. या सर्वांचा मिलाफ असलेला हा चित्रपट निर्माता सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांच्या मोठ्या दृष्टीकोनाची झलक दाखवतो. या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो अभिनेते अजिंक्य रमेश देव (Ajinkya Ramesh Dev) एक भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत.
देखणा, स्टायलिश आणि थोडासा कॅसानोव्हा स्वभावाचा. त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम मोकळं, धडाडीचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं दाखवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून दिसते जी लंडनमध्ये स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवते.
लंडनच्या चमचमणाऱ्या लोकेशन्समुळे त्यांच्या प्रेमाची प्रत्येक फ्रेम अधिकच उठून दिसते. मराठी सिनेमात पहिल्यांदाच इतक्या ग्रँड स्केलवर चित्रिकरण झाले असून, रोल्स रॉयसची लक्झरी, प्रसिद्ध हेरिटेज लोकेशन असलेला हार्टलेबरी कॅसलचे राजेशाही वैभव आणि इतर अप्रतिम लोकेशन्समुळे प्रत्येक फ्रेमला भन्नाट आंतरराष्ट्रीय भव्यता लाभली आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला असून, ज्यूरी आणि प्रेक्षकांकडून त्याला विशेष दाद मिळाली.
ट्रेलर मध्ये हि प्रेमकहाणी जिथे सुंदर उंची गाठते, तिथेच एक अनपेक्षित वळण दिसतं. तेजश्री अचानक अजिंक्यपासून दूर जाताना दिसते. या निर्णयामागचं कारण काय? हे रहस्यच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरतं. अमोल शेटगे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत अनेक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. मुख्य कलाकारांसोबतच माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर यांसारखे दमदार आणि अनुभवी मराठी कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत.
भरत जाधव – महेश मांजरेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!
ही भव्य निर्मिती मॅक्समस लिमिटेड या प्रतिष्ठित बॅनर्स अंतर्गत साकारली आहे. सिनेमाचे निर्माते सचिन नाहर आणि अनिश शर्मा तसेच सह निर्माते अमोग मलाविया, सुरेश गोविंदराय पै हे आहेत. उप-निर्माता आशा नाहर, डी ओ पी सोपान पुरंदरे, तर निलेश मोहरीर ह्यांनी सिनेमाला संगीत दिलय. येत्या 28 नोव्हेंबर 2025 ला ‘असा मी अशी मी’चा सिनेमॅटिक प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
