Download App

Khupte Tithe Gupte: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी गोष्ट कोणती? नावाकडे पाहून बिचुकले म्हणाला…

Khupte Tithe Gupte : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte ) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. याचं कारण देखील तसंच आहे, अभिजीत बिचुकले. (Entertainment) ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या भागामध्ये ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले राजकारणी अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) याने हजेरी लावणार असल्याचे बघायला मिळत आहे. परंतु प्रेक्षकांना हे चांगलच खटकलं आहे.


‘अरेरे… किती वाईट दिवस आले आहेत गुप्तेवर’, (Social media) ‘कार्यक्रमाचा दर्जा घालवू नका’, ‘डोक्यावर पडले आहेत का’?, ‘गुप्ते तुम्ही शो सोडून द्या’, अशा टीकेची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. अभिजीत बिचुकलेंच्या भागाचा नवा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यात अवधूत गुप्तेच्या एका सवालाच उत्तर देत असताना बिचुकले बघायला मिळत आहे. अवधूत गुप्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नाव दाखवून विचारतो, “यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती?”


यावर अभिजीत बिचुकले म्हणतात की, “आमच्या दोघांची परिस्थिती सध्या एकसारखी आहे. त्यांच्याकडे एकेकाळी १३ आमदार आले होते आणि माझं अजून खात उघडायचं असल्याची प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली आहे.

त्यानंतर अवधूत विचारतो की, “तुम्ही मनसेमध्ये सामील का नाही होत?” यावर देखील बिचुकलेनी प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाला की “बोलावणं आल्याशिवाय नाही.” असा हा नवा प्रोमोचा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे. याअगोदरच्या प्रोमोत अभिजीत बिचुकले स्वतःच्या इंग्रजी भाषेचं कौतुक करत असल्याचे दिसले होते. बिचुकले म्हणतात, “मी इंग्रजी असं बोलतो ना की, मी बोललेले शब्द संपूर्ण डिक्शनरीमध्ये कुठे लिहिले आहेत हे समजणार नाही.” त्यानंतर ते काही वाक्यं इंग्रजीमध्ये बोलत असल्याचे देखील बघायला मिळाले होते. हे सर्व ऐकून अवधूत गुप्ते म्हणतो, “एवढं फाडफाड इंग्रजी बोलायला लागलात की, मला आता कौतुकानं काय करावं हेच कळत नाही.अशी प्रतिक्रिया अवधूतने यावेळी दिली.

Jawan: ‘जवान’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने किंग खान भारावला; ट्वीट करत म्हणाला…

दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात याअगोदर जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे देखील सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us