Abhijeet Sawant mesmerized the Bigg Boss contestants : बिग बॉस मराठीचा प्रवास अगदीच काही दिवसांनी संपणार असून या आधी जुन्या स्पर्धकांना बिग बॉसच्या पुन्हा एकदा या जादुई घरात जाण्याची संधी मिळाली आणि याच संधीच सोनं करत गायक अभिजीत सावंत ने घरातल्या सगळ्या मित्र मैत्रिणी ना सुखद धक्का दिला आहे. घरात जाऊन त्याने एक खास गाणं देखील परफॉर्म केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकून घेतली.
अभिजीत मागच्या पर्वाचा उपविजेता ठरला आणि त्याने जगभरातील प्रेक्षकांना बिग बॉस मधून भुरळ घातली होती आणि आता अभिजीतला पुन्हा एकदा या घरात जाण्याची संधी बिग बॉस मराठीमुळे मिळाली. घरात जाऊन बाकी मित्र मैत्रिणी ना सल्ले तर दिले पण त्याने अशी एक अनपेक्षित गोष्ट केली ज्याने घरातली सगळे सदस्य आणि प्रेक्षकांना सुखद धक्का बसला आहे.
महिला आरक्षणाच्या वादात पंतप्रधान मोदींची एन्ट्री; आज रात्री देशाला संबोधन ,वादळ शमणार की वाढणार?
बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमो मध्ये अभिजीत ने घरात जाऊन घरातल्या सगळ्या साठी ” तुम बिन” सिनेमातील एक खास गाणं गायलं आहे. हा क्षण अगदी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहे यात शंका नाही.
आजवर अभिजीत ने जगभरातील प्रेक्षकांना त्याचा सुमधुर आवाजाने भुरळ घातली आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात देखील त्याचा जादुई आवाजाने प्रेक्षक खुश होणार आहेत.
