Download App

Abhishek Bachchan: फ्लॉप चित्रपटांना वैतागून bollywood पासून होता दूर …

Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)… हे नाव जरी नुसतं घेतलं तरी समोर एक प्रतिमा उभी राहिते… उंचपुरा, भारदस्त आवाज आणि संवेदनशील अभिनय… एक यशस्वी अभिनेता म्हणायला जे काही मापदंड आहेत ते सगळे बिग बी (Big B) अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केले आहेत. मात्र त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा हे चित्र वेगळं आहे. ‘बाप से बेटा सवाई’ असं आपण म्हणतो. पण अभिषेक बच्चनच्या बाबतीत मात्र हे म्हणणं लागू होत नाही, असं का तर तेच आपण जाणून घेणार आहोत.


अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला बॉलिवूडमधील (Bollywood) एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्यानं आजवर रोमँटिक, अॅक्शन, सस्पेन्स, विनोदी अशा अनेक वेगवगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता नुकतचं त्याने अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा घूमर चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केलं आहे. ‘घूमर’मध्‍ये अभिषेकच्‍या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

आतापर्यंत परंतु अभिषेकच्या एकाही चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणता येईल, असं यश तिकिटबारीवर मिळालेलं नाही. ज्या चित्रपटांना यश मिळालं त्याचं श्रेय नेहमीच इतर कलाकारांना दिल्याचे बघायला मिळाले. त्यामुळं अभिषेकवर एक फ्लॉप अभिनेता म्हणून मोठ स्टँप लावला गेला. या स्टँपमुळं नैराश्येत जाऊन त्यानं बॉलिवूड काळ लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. बिग बींच्या (Amitabh Bachchan) सल्ल्यामुळं तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.

अभिषेक बच्चनचा घूमर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेकनं बिग बींनी दिलेला सल्ला सांगितला. तो म्हणाला, “मी महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळं कायम माझी तुलना वडिलांसोबत केली जाते. माझ्या यशाची तुलना कायम त्यांनी मिळवलेल्या यशाची केली जाते. लोक मला कायम फ्लॉप अभिनेता म्हणून चिडवायचे. अन् या सतत होणाऱ्या टीकेला वैतागून मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वडिलांनी मला रोखलं. म्हणून आजपुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचे केले आहे.

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

अमिताभ यांनी अभिषेकला असा सल्ला दिला आहे की, खूप विचार करून भूमिका निवड आणि तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. वडील अमिताभ बच्चन यांचा हाच सल्ला अभिषेकच्या हृदयात घर करून राहिला. यामुळेच त्याने बॉलिवूड सोडण्याची कल्पना आपल्या मनातून काढून टाकली. याचाच परिणाम म्हणजे अभिषेक बच्चन आता केवळ सिनेमात नव्हे तर ओटीटीच्या व्यासपीठावर देखील स्वत:ला सिद्ध करून दाखवत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us