Abhishek Kapoor: आयकॉनिक सिनेमा ‘रॉक ऑन’ (Rock On)15 वर्षाचा पूर्ण झाले आहेत असून या सिनेमाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. या सिनेमाने प्रेक्षकांच्या हृदयात एक उत्तम स्थान कोरले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण सिनेमा होता. चाहत्यांनी कायम या सिनेमाला भरभरून प्रेम दिलं आणि आज 15 वर्षांनी देखील हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
2008 मध्ये प्रदर्शित झालेला “रॉक ऑन” केवळ सिनेमा नव्हता तर संगीत प्रेमीसाठी एक अनोखी पर्वणी असलेला हा ब्लॉकबस्टर (blockbuster) सिनेमा होता. मैत्री, स्वप्न आणि संगीत यांचा मिलाप असणाऱ्या चित्रपटाची कथा प्रेक्षकांनी आपलीशी केली आणि या चित्रपटाने जोरदार यश कमावलं आहे.
अभिषेक कपूरने चित्रपटाची 15 वर्षे साजरी करताना असताना सांगितलं आहे की, “हा सिनेमा अगदी काल आज घडल्यासारखा वाटतो. दरवर्षी हा दिवस सिनेमाच यश साजर तर करतोच. परंतु 15 वर्षांनी हा चित्रपट आजही प्रेक्षकांना मोहित करून जातो. यासाठी मी कायम प्रेक्षकांचा ऋणी राहणार आहे. रॉक ऑनने मला ओळख संपादन करून दिली आणि हा चित्रपट वर्षानुवर्षे असच प्रेम मिळवत राहणार यात शंका नाही.
Jailer: थलायवाच्या ‘जेलर’मधील ‘तो’ सीन हटवण्याचा न्यायालयाकडून आदेश
बॉलीवूडच्या (Bollywood) जगात ‘संगिता’ वर आधारित सिनेमाची कहाणी त्यातली पात्र ही कायम सगळ्यांच्या मनात राहून गेली आहेत. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अर्जुन रामपाल असे दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. या कल्ट क्लासिक सिनेमाची सुपरहिट 15 वर्ष पुन्हा एकदा सिनेमाच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जाणार आहेत.