Ajinkya Nanavare: नाटक- मालिकेतील लाडका चेहरा अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanavare) आता आपल्या डॅशिंग अंदाजात मोठा पडदा सुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘सोंग्या’ (Songya Movie) या चित्रपटात अजिंक्य प्रमुख भूमिकेत दिसणार असून यशराज ही त्याची भूमिका चित्रपटाला कलाटणी देणारी आहे. (Marathi Movie) निरामि फिल्म्स प्रस्तुत ‘सोंग्या’ चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या चित्रपटाची निर्मिती मिलिंद इनामदार, निशांत काकिर्डे, राहुल पाटील यांनी केली असून दिग्दर्शन मिलिंद इनामदार (Milind Inamdar) यांचे आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर अजिंक्यने आजवर अनेक नाटक-मालिका तसेच चित्रपटातही काम केले आहे पण ‘सोंग्या’ मधून अजिंक्य प्रथमच मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अजिंक्यने साकारलेला यशराज हा उच्चशिक्षित असून देखील कुटुंबाची मानमर्यादा आणि समाज यांच्या जाळ्यात कसा अडकत जातो याचं उत्तम दर्शन घडवतो.
वडिलांच्या प्रतिष्ठेपुढे नमतं घेणारा यशराज साकारताना, ”आजही अशा कुप्रथा अस्तित्वात आहेत आणि त्यात असंख्य निरपराधांचा बळी जातोय हे समजल्यावर खरंतर मला धक्काच बसला आणि म्हणूनच मी या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अशा चित्रपटाच्या माध्यमातून आपण जनजागृती घडवणं ही काळाची गरज आहे” असं अजिंक्य सांगतो. कुप्रथांना वाचा फोडणाऱ्या एका संवेदनशील विषयवार भाष्य करणाऱ्या ‘सोंग्या’ या चित्रपटात अजिंक्य ननावरेला ऋतुजा बागवे, गणेश यादव, अनिल गवस यांची साथ लाभली आहे.
Box Office: ’सॅम बहादूर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; आठव्या दिवशी फक्त ‘एवढीच’ कमाई
सोबतचं योगेश चिकटगावकर, दिपाली जाधव, अमोल भोसले, अपर्णा काकिर्डे, वैशाली जाधव, श्रद्धा धामणकर, प्रदीप सरवदे, प्रदीप डोईफोडे, आशिष शिर्के आदी कलाकारांच्या देखील यात भूमिका पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यादव यांची आहे तर गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.