Aparshakti Khurana: आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मने जिंकून घेणारा अभिनेता (Aparshakti Khurana) म्हणून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जात असते. बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया, दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी इत्यादी सिनेमात त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्याचे बघायला मिळाले आहे. त्याच्या या सर्व भूमिका कायम विनोदी असतात.
तसेच तो नेहमीच त्याच्या अनोख्या अभिनय कौशल्यासाठी ओळखला जात असतो. त्याने नेहमीच हटक्या भूमिकांनी आपल्या अभिनायची जादू ही अलीकडे शिकागो येथील दक्षिण आशियाई चित्रपट इन अमेरिका (SAFA) मध्ये बघायला मिळाली आहे, आणि त्याला खास पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येक भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून त्यांना जिवंत करण्याचे काम अपारशक्तीच्या अभिनयातून दिसून देत असते.
शिकागो येथील SAFA अवॉर्ड्समध्ये त्याला नुकताच एक पुरस्कार देण्यात आला असून त्याच्या उल्लेखनीय अभिनय अष्टपैलुत्वावर यातून प्रकाश पडला आहे. त्याचा जागतिक प्रभाव देखील सिद्ध झाला आहे. अपारशक्ती खुराणा यांचा नुकताच झालेला हा सन्मान नक्कीच कमालीचा आहे. ‘स्त्री 2’ आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंटसह फाइंडिंग राम या बायोपीकमध्ये बघायला मिळणार आहे.
Pragati Srivastava: कलर यलो प्रॉडक्शन्समध्ये प्रगती श्रीवास्तवची धमाकेदार एंट्री
अपारशक्तीला अभिनयाची खूपच आवड असल्याचे बघायला मिळत असते. त्यादृष्टीने नंतर त्याने अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. बॉलिवूडचा परफेक्शनिस्टअभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या सिनेमातून अपारशक्तीने अभिनयात पदार्पण केले होते. हा सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तूफान कामगिरी केल्याचे बघायला मिळाले होते.