Download App

Govinda: तब्बल 1 हजार कोटींच्या पॉन्झी प्रकरणात गोविंदाची होणार चौकशी

  • Written By: Last Updated:

Govinda : ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता गोविंदाची (Govinda) चौकशी होणार आहे. तब्ब्ल १ हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळा प्रकरणात (Ponzi scam case) ही चौकशी होणार आहे. क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. (Crime) कंपनीने तब्ब्ल २ लाख लोकांकडून १ हजार कोटी पैसे जमा केल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओत या कंपनीचं समर्थन केल्याचा धक्कादायक आरोप लावण्यात आले आहे.

सोलर टेक्नो अलायन्स (STA- Token) हे अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाइन पॉन्झी योजना चालवत असल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. तसेच या ऑनलाइन पॉन्झी योजनेत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृततेशिवाय देशामधील २ लाखापेक्षा जास्त लोकांकडून १ हजार कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचे देखील आर्थिक गुन्हे शाखेनं यावेळी सांगितलं आहे.

Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीच स्वप्न साकार;‘जवानच्या डायलॉगची जोरदार चर्चा

या कंपनीच्या विविध प्रमोशनल व्हिडीओत अभिनेताने त्यांची प्रसिद्धी केली होती. म्हणूनच या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी गोविंदाची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही गोविंदाच्या चौकशीसाठी लवकरच मुंबईला एक टीम पाठवणार आहोत. त्याने जुलै महिन्यामध्ये गोव्यात पार पडलेल्या या कंपनीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कंपनीच्या काही व्हिडीओत त्यांनी कंपनीची प्रसिद्धी केली होती, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर जनरल जे. एन. पंकज यांनी यावेळी दिली आहे.

Naseeruddin शाहांच्या वक्तव्यावर नाना पाटेकरांनी सुनावलं; म्हणाले, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली…’

सध्या तरी गोविंदा याप्रकरणी संशियत किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे, त्याची भूमिका फक्त जाहिरातीसाठी मर्यादित होती, असं निष्पन्न झाल्यास आम्ही त्या या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून बनवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच संबंधित कंपनीने भद्रक, किओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वर या ठिकाणी तब्बल १० हजार लोकांकडून ३० कोटी रुपये जमा केले होते. एवढेच नाही तर त्यांनी बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणा, दिल्ली, झारखंड, आसाम आणि मध्यप्रदेश या ठिकाणी देखील गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांच्या ठेवी देखील घेतले आहेत.

Tags

follow us