Ghaath Trailer Released : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Berlin Film Festival) ‘घात’ चित्रपटाचा (Ghaath Movie) वर्ल्ड प्रीमियर पार पडला. आता हा चित्रपट महाराष्ट्रातील सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. (Marathi Movie) माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. (Ghaath Trailer) माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो. आता या सिनेमाचा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘घात’ सिनेमाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांच्या भूमिका आहेत. सिनेमेटोग्राफी उदित खुराणा यांनी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
घात हा एक खोल आशय असलेला मराठी सिनेमा आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रीकरण करणारा ‘घात’महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो, जिथे कायद्याचं राज्य तर आहे पण आमलात नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद काहीतरी धोकादायक दडलेलं असू शकतं, तशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला पाहायला मिळणार आहे.
‘घात’ला बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन देण्यात आले होते. या सिनेमाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला. ‘घात’ मराठी सिनेमाच्या टीमने थेट ऑस्करचं स्वप्न बघितलं आहे. आणि भारतातून ऑस्करला जाणाऱ्या अधिकृत सिनेएंट्रीसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. 27 सप्टेंबर 2024 ला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरांत तसेच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Panchak Marathi Movie: बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ
छत्रपाल निनावे
छत्रपाल निनावे एक भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. 2022 मध्ये, छत्रपाल हे बर्लिनेल टॅलेंटचा भाग होते. ‘घात’ हा त्यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे.