Download App

Prasad Khandekar: प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’, येणार या दिवशी भेटीला

Prasad Khandekar: आपल्या बहारदार सादरीकरणाने चाहत्यांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीमध्ये बसलेला बघायला मिळले आहे. (Social media) प्रसाद खांडेकरचा “एकदा येऊन तर बघा” रिटर्न जाणार नाही,  (Ekda Yeun Tar Bagha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ( Marathi Movie) धमाल सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर याने केले आहे.


तसेच हा सिनेमा अस्सल मराठमोळ्या कॉमेडीचा तडका मारलेली, लहान-मोठे सगळयांना पोट भरून हसवणारी, २४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात सुरु होतेय मनोरंजनाची हमखास गॅरंटी असलेली भरपेट मेजवानी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात झाली आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर आदि कलाकार या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहेत.

अभिनेता असण्याबरोबरच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक स्किटचे लेखन तो करत असतो. त्याच्या नवीन सिनेमाचे लेखन देखील त्यानेच केले आहे. प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित सिनेमा बघायला मिळणार असल्याने चाहते देखील खूश झाले आहेत. ‘कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रोडक्शन्स’ आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’ यांच्या वतीने नुकतीच ७ मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. कॅलिडोस्कोप’चे पारितोष पेंटर आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’चे राजेश कुमार मोहंती हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप ‘या’ सिनेमात झळकणार

अभिनेता प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. आता प्रसाद त्याच्या नवीन प्रवसाला सुरुवात करत आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत बघायला मिळत आहे.

Tags

follow us