‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात ‘ब्योमकेश बक्षी’ फेम अभिनेता साकारणार औरंगजेबची भूमिका

Rajit Kapoor: ‘ब्योमकेश बक्षी’ या सिरीयलमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर (Rajit Kapoor) औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji Movie) या मराठी सिनेमात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत बघायला मिळणार आहेत. (Marathi Movie)हा सिनेमा येत्या 2 फेब्रुवारी 2024 दिवशी आपल्या आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे. […]

Rajit Kapoor: 'छत्रपती संभाजी' चित्रपटात ‘ब्योमकेश बक्षी' फेम अभिनेता साकारणार औरंगजेबची

Rajit Kapoor: 'छत्रपती संभाजी' चित्रपटात ‘ब्योमकेश बक्षी' फेम अभिनेता साकारणार औरंगजेबची

Rajit Kapoor: ‘ब्योमकेश बक्षी’ या सिरीयलमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर (Rajit Kapoor) औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji Movie) या मराठी सिनेमात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत बघायला मिळणार आहेत. (Marathi Movie)हा सिनेमा येत्या 2 फेब्रुवारी 2024 दिवशी आपल्या आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे. परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी रिलीज करण्यात येणार आहे.

भूमिकेला न्याय देऊ शकणार: औरंगजेब क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि कपटी होता. यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता, रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ शकणार आहेत. यामुळे त्यांना ही संधी दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह दुलगज यांनी सांगितलं आहे.आपल्या या भूमिकेबद्दल बोलत असताना रजित कपूर ते सांगतात की, मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत.

ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली: ‘छत्रपती संभाजी’ च्या निमित्ताने मला पहिल्यांदाच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. या मराठी सिनेमाचा मी महत्त्वपूर्ण भाग असल्याचा याचा मला आनंद आहे. रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार ‘छत्रपती संभाजी’ मराठी सिनेमात आहेत.

OTT Release: रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ ओटीटीवर रिलीज होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत सिनेमाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

Exit mobile version