Download App

Rajkummar Rao Look: ‘गन्स अँड गुलाब’चा अभिनेता राजकुमार रावच्या लूकने जिंकली प्रेक्षकांची मन!

Rajkummar Rao Look: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा अनोखी असते. आता लवकरच तो नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे आणि तेही वेब सिरीजमधून. ‘गन्स अँड गुलाब’ (Guns and Gulaabs) असे या वेब सिरीजचे नाव आहे.

नुकताच या सिरीजमधील त्याच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. हा लुक सध्या सोशल मिडीयावर (Social media) भरपूर व्हायरल होत आहे. तसेच ‘बरेली की बर्फी मधला साईड रोल असो किंवा शादी मे जरुर आना मधला तडफदार ऑफिसर,राजकुमार रावने आपली भूमिका चोख बजावली आहे. राजकुमार रावच्या कामाची शैलीच वेगळी आहे.

https://twitter.com/amarsr_1990/status/1693243102339776913?s=20

तर चाहत्यांनी देखील जोरदार कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे.एका चाहत्याच्या ट्विटमध्ये राव यांची अष्टपैलुत्व आणि करिष्मा सुंदरपणे कॅप्चर करण्यात आली अस लिहिलं” आत्ताच #GunsAndGulaabs पाहिला आणि पुन्हा एकदा, #RajkummarRao ने एक अभिनेता म्हणून त्याची अतुलनीय अष्टपैलुत्व आणि समर्पण सिद्ध केले!

आणखी एक ट्विट राजकुमार रावच्या अपवादात्मक कामगिरीवर प्रभावीपणे प्रकाश टाकते, वेब सीरिजच्या आकर्षक कथनात त्याच्या भूमिकेकडे लक्ष वेधून घेते.

लीड रोल किंवा बिग बजेट चित्रपट याला तो कधीच महत्व देत नाही. सुरुवातीपासूनच मिळालेली प्रत्येक भूमिका त्याने प्रामाणिकपणे केल्यामुळे इतर कलाकारांपेक्षा जास्त लक्षात राहिला आहे. दिबाकर बॅनर्जी आपल्या चित्रपटासाठी नविन चेहर्‍याच्या शोधात होते. हे राजकुमार रावला कळले. तो त्यांच्य ऑफिसमध्य्ये गेला, ऑडीशन दिली आणि त्याला त्याच्या आयुष्यातला पहिला चित्रपट ‘लव्ह सेक्स और धोका’ मिळाला.

Prakash Raj यांनी केलं ‘विक्रम लँडर’चं तोंडभरून कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर म्हणाले…

चित्रपटाचे नाव, विषय आणि यात तो साकारत असलेले पात्र याचा विचार न करता त्याने मनापासून काम केले. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले तरी दिबाकर बॅनर्जीचा चित्रपट म्हणून अनेक समीक्षकांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आवर्जून हा चित्रपट पाहीला. या चित्रपटाने त्याला अभिनेता म्हणून ओळख दिली. त्यानंतर अभिनेता म्हणून सुरु झालेला प्रवास आजही सुरु आहे.

Tags

follow us