Download App

आपण एकत्र येऊन त्यांना ठणकावून सांगायला हवं की काश्मीर हा..पहलगाम हल्ल्यावरून रितेश देशमुखच मोठ वक्तव्य

रितेश म्हणाला की, "हे खूपच दुःखद आहे. देशभरातून लोक सुट्टीसाठी पहलगामला जातात. एकेदिवशी अचानक त्या ठिकाणी दहशतवादी येतात

  • Written By: Last Updated:

Riteish Deshmukh on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात अस्वस्थतेचं वातावरण आहे. देशात संतापाची लाट उसळली (Terror) असून अनेकांनी या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्याची मागणी केली.

अनेक सेलिब्रिटीजनीही दहशतवादाला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली आहे. नुकतंच अभिनेता रितेश देशमुखने पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रितेशने नुकतीच फिल्मीज्ञान चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रितेशने प्रतिक्रिया व्यक्त केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये 175 संशयित ताब्यात

रितेश म्हणाला की, “हे खूपच दुःखद आहे. देशभरातून लोक सुट्टीसाठी पहलगामला जातात. एकेदिवशी अचानक त्या ठिकाणी दहशतवादी येतात आणि गोळीबार सुरु करतात. हा केवळ त्यांच्या कुटूंबासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी मोठा धक्का आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ला हा समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतो.”

“मला पूर्ण विश्वास आहे की, आपलं सरकार या प्रकरणी कठोर कारवाई करत आहे. कोणताही शेजारचा देश आपल्यावर हुकूमशाही करू शकत नाही. यासाठी आपण एकत्र येऊन काश्मीर हा भारताचा भाग आहे. असं त्यांना ठणकावून सांगायला हवं.” असं म्हणत त्याने या हल्ल्याचा निषेध केला.

follow us