Download App

Shabana Azmi B’day: दोन लेकरांचा बाप अन् जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न; जाणून घ्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी…

Happy Birthday Shabana Azmi: मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहे. शबाना आझमी या बॉलिवूडमधील मोठे नामवंत कलाकारांपैकी  एक आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे शबाना आझमी यांचे बॉलिवूडमध्ये एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. ७३ वर्षांच्या असलेल्या शबाना आझमी यांची आज देखील लव्हस्टोरीची चर्चा चांगलीच सुरु असते.


शबाना आझमी या प्रेमप्रकरणामुळे कायम चर्चेत येत असतात. त्यांच्यापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठे आणि विवाहित असलेल्या जावेद अख्तरांबरोबर लग्न केले. या प्रेमप्रकरणांमुळे ते नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. आज आपण शबाना आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या लव्हस्टोरीविषयी चला तर मग जाणून घेऊया…

शबाना आझमी या त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी आई-वडिलांच्या विरोधामध्ये बंड पुकारत जावेद अख्तर यांच्याबरोबर लग्न केले होते. शबाना आणि जावेद अख्तरची रंजक प्रेमकहाणी त्यांच्या घरापासून सुरू झाली होती. शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांच्याकडून कविता ऐकण्यासाठी जावेद अख्तर त्यांच्या घरी नेहमी  येत असायचे. यावेळी शबाना आझमी या त्यांच्या आईबरोबर या मैफिलीमध्ये सहभागी होत असायची. त्या दरम्यानच शबाना आझमी आणि जावेद अख्तर एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडल्याचे त्यांनी एकदा सांगितलं होत.

Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन

शबाना आझमींच्या कुटुंबीयांनी या प्रेमाला आणि लग्नाला जोरदार विरोध होता. परंत्तू जावेद अख्तर हे त्यावेळी विवाहित देखील होते आणि त्यांना दोन मुलं होती. असे असताना सुद्धा आपली मुलगी अख्तरांच्या नात्यात येऊ नये असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. परंतु शबाना आझमी या आपल्या निर्णयावर ठाम होते. लग्न करेल तर जावेद अख्तरांनी असं त्यांचे म्हणणे होते. १९८४ साली शबाना आझमी यांनी त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले आहे. जावेद अख्तर यांनी लग्नाच्या तब्बल ७ वर्षानंतर पहिली पत्नी हनी इराणी यांना घटस्फोट दिल्याचे समोर आले होते.

शबाना आझमी यांचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर देखील अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी या नात्याबद्दल देखील मोठा खुलासा केला होता. त्या शेखर कपूर यांच्याबरोबर अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये देखील होत्या. परंतु नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. जया भादुरी अभिनीत ‘सुमन’ सिनेमा बघून शबाना आझमी इतक्या प्रभावित झाल्या होत्या की, त्यांनी सिनेसृष्टीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. शबाना आझमी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शबाना यांना ‘अंकुर’, ‘अर्थ’, ‘पार’, ‘गॉडमदर’ आणि ‘खंधार’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार देखील देण्यात आला होता. शबाना आझमी यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला होता.

Tags

follow us