Deva Movie Release Date: शाहिद कपूरचा ‘देवा’ सिनेमातील फर्स्ट लूक प्रदर्शित

Deva Movie Release Date: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) ‘कबीर सिंग’ या सिनेमातून जबरदस्त कमबॅक केला. या सिनेमानंतर शाहिदच्या फिल्मी करियरला एक वेगळंच वळण मिळालं. दसऱ्यानिमित्त शाहिदनं चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं ‘देवा’ (Deva Movie) या त्याच्या आगामी सिनेमातील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्या या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.   […]

Deva Release Date

Deva Release Date

Deva Movie Release Date: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) ‘कबीर सिंग’ या सिनेमातून जबरदस्त कमबॅक केला. या सिनेमानंतर शाहिदच्या फिल्मी करियरला एक वेगळंच वळण मिळालं. दसऱ्यानिमित्त शाहिदनं चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं ‘देवा’ (Deva Movie) या त्याच्या आगामी सिनेमातील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्या या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.


शाहिदनं सोशल मीडियावर (Social media) एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहिद हा व्हाईट शर्ट, डोळ्यावर गॉगल आणि हातात बंदुक अशा डॅशिंग लूकमध्ये बघायला मिळत आहे. शाहिदनं हा फोटो शेअर करुन देवा या त्याच्या आगामी सिनेमाची प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

‘देवा’ हा सिनेमा 11 ऑक्टोबर 2024 दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात शाहिद आणि अभिनेत्री पूजा हेगडे हे मुख्य भूमिका साकारणार आहेत. देवा सिनेमाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज करणार असून झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्स हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

शाहिदने 2003 मध्ये ‘इश्क-विश्क” सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर या शाहिदनं ‘जब वी मेट’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’ यांसारख्या अनेक हिट सिनेमात आपल्या अभिनयाची कामगिरी बजावला आहे. ‘कबीर सिंह’ या त्याच्या सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. तसेच शाहिदनं ‘फर्जी’ या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. ‘ब्लडी डॅडी’ या त्याच्या ओटीटीवरील सिनेमाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता शाहिदचे चाहते त्याच्या देवा या आगामी सिनेमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tiger 3: भाईजान अन् कतरिनाचा जलवा; टायगर 3 मधील गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती

तसेच शाहिदचा आणखी एक आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहिद हा कृती सेननसोबत रोमान्स करताना बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या नावाची माहिती अजून देण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहिद आणि कृती यांच्या या आगामी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Exit mobile version