Download App

Sonu Sood Post: ‘फतेह’ चित्रपटाच शूटिंग पूर्ण होताच अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले…

Sonu Sood Post: अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी (Fateh Movie) चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. सोनूने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्या सोबत पडद्यामागील फोटो शेअर करत पोस्ट केल्याचे बघायला मिळत आहे.


या निमित्ताने या कलाकारांमधील केमिस्ट्री बघायला मिळाली. या दोघांची ऑन-स्क्रीन जादू मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत, सोनूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असताना कॅप्शन दिले आहे, पोस्टमध्ये लिहिले आहे की, “फतेह ही एक जादुई प्रवासाची फक्त सुरुवात आहे आणि मी या चित्रपटाचं शूट पूर्ण केल आहे. जॅकी मी तुझ्या नम्रतेची परिश्रमाची आणि समर्पणाची मनापासून प्रशंसा करतो, अशी पोस्ट अभिनेत्यांनी यावेळी केली आहे.

‘फतेह’ हा चित्रपट पंजाबमधील अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. सोनू सूदच्या स्वतःच्या होम प्रॉडक्शन शक्ती सागर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली याची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस बघायला मिळणार आहे. सोनू सूदने या चित्रपटाच्या कथेबद्दल संकेत दिले. हा चित्रपट हॅकर्सवर आधारित असणार आहे. गेल्या दीड वर्षापासून सोनू सूद त्याच्या स्क्रिप्टवर काम करत होता. यासाठी त्याने काही प्रोफेशनल हॅकर्सनाही भेटला, जेणेकरून त्याला त्याच्या कथेतील सत्यता बघायला मिळणार आहे.

Singal Marathi Movie: ‘दोस्त दोस्त ना रहा’, अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

‘फतेह’ हा सिनेमा सोनू सूदचा अ‍ॅक्शन चित्रपट असणार असून हॉलीवूड-प्रेरित स्टंट्ससह उत्साह वाढवणारा असणार आहे. अलीकडेच सोनू सूदने काही खास फोटो शेयर केले असून पडद्यामागील या फोटोची सोनूने खास झलक दाखवली आहे. सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची एक आकर्षक झलक लवकरच बघायला मिळणार आहे. भारतीय सिनेमात हॉलीवूड-शैलीचा थरार अनुभवण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. झी स्टुडिओज, शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने, ‘फतेह’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us