Jiah Khan Suicide Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज हा मोठा निकाल देताना न्यायालयाने सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निकालावेळी जियाची आई देखील उपस्थित होती.
Actor Sooraj Pancholi acquitted of abetment charges in Jiah Khan suicide case pic.twitter.com/SUM97xLqeP
— ANI (@ANI) April 28, 2023
तब्बल 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता केले आहे. सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अगोदर मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.
पुराव्यांअती हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही. यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद यावेळी म्हणाले आहेत. ३ जून २०१३ रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. जिया खानच्या घरातून तब्ब्ल ६ पानांची सुसाईड नोट सापडली होती.
या सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे असे अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप करण्यात आले होते. या मृत्यू प्रकरणातून सूरजची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.