Marathi Celebrity on Maharashtra Political Crisis: काळ राज्याच्या राजकारणामधला सर्वात मोठा भूकंप बघायला मिळला आहे. (Maharashtra Political Crisis) त्यामुळे सध्या सर्वत्र चर्चांना उधाण येत आहेत. तसेच आता या घडलेल्या घडोमाेडींवर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे, त्याच प्रमाणे मराठी मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील कलाकार देखील यावर आपली खोचक व सडेतोड मते सोशल मीडियावर (Social media) मांडली आहेत. अनेक कलाकारांनी ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवले आहेत.
आतापर्यंत काही अभिनेते आणि दिग्दर्शकांनी आपले मते मांडले आहेत. हेमंत ढोमे, अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, गायक उत्कर्ष शिंदे यांनी आपली मतं ट्विटरच्या माध्यमातून मांडले आहेत. यामुळे या घडलेल्या घटनेवरून सेलिब्रेटींनी देखील चांगलंच धुरळा उडावला आहे. या कलाकारांच्या ट्विटवर चाहत्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. नक्की हे कलाकार काय म्हणाले आहेत आणि त्यांच्या या ट्विटवर नक्की कोणत्या कोणत्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत चला तर मग एकदा पाहूया.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक ट्विट केलं होते, ज्यामध्ये तिनं सांगितले आहे की, “तत्वनिष्ठ, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अशाच माणसाने आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं. – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक,” त्याचबरोबर पुढे तिनं हॅशटॅग दिला आहे की #महाराष्ट्रआतातरीजागाहो. या तिच्या ट्विटखाली अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
तसेच अनेकांनी राज ठाकरेंचे नाव घेत त्यांनी राजकारणात उतरावं असं सांगितले आहे. त्याबरोबरच तिनं अजून एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये तिनं सांगितले आहे की, ”भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!” त्याचसोबत त्यापुढे तिनं #Maharashtrapolitics असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
अभिनेता स्वप्निल जोशीने देखील एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ”उत्तम पटकथा लिहिण्याची कला” त्यामुळे त्याच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी लिहिलंय की, ”तूम्हीही यावर असाच एक सिनेमा करा जो खूप जोरदार चालणार आहे.”
तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सिरियलचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपातील काँग्रेस नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार…या मतदारांची ऐशी तैशी..’, अशा या त्यांच्या पोस्ट खाली भन्नाट आणि खोचक कमेंट्स येत असल्याचे दिसून आले आहे.
तसेच गायक आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदे याने देखील एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये तो म्हणाला आहे की, ”मतदात्याच्या बोटाला शाही नाही, तर आता चुनाच चुना…”. त्यानं इन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
तर लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही एक ट्विट केलं आहे, यामध्ये त्यांनी म्हणाले आहे की, ”खेळ तर आता सुरु झालाय…” सध्या मराठी कलाकारांच्या या ट्विटनं सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.