Download App

मराठमोळ्या स्वप्निलचं लंडनमध्ये शूटिंग; टीमचं मन जिंकणारं काम

Swapnil Joshi : अभिनेता स्वप्निल जोशी हा नेहमीच वेगवेगळ्या कामांमुळे चर्चेत असतो. आपल्या टीमसोबत तो कसं काम करतो याची एक झलक दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्वप्निल चक्क कॅमेरा उचलून काम करण्यासाठी मदत करत असल्याचं दिसून आलं आहे.

चित्रपटसृष्टीत नेहमची स्वप्निल जोशीची चर्चा सुरु असते, आताही चर्चा करण्यासारखंच काम स्वप्निलने केलं आहे. सध्या स्वप्निल त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. शूट सुरु असताना आपल्या टीमला स्वप्निलचं नेहमीच सहकार्य लाभत असतं, याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

Prabhas: काय… प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का

सेटवर चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर स्वप्निलने स्टेडी कॅमेरामनला मदत करण्यासाठी चक्क पुढे सरसावल्याचं पाहायला मिळालंय. कुठलीही लाज न बाळगता स्वप्निलने चक्क कॅमेरा उचलून कॅमेरामनची मदत केली आहे. स्वप्निलने कॅमेरामनला मदत केल्याची कृती पाहताच शुटींगसाठी उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये एकच चर्चा रंगली.

Zareen Khan: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अभिनेत्रींचे खेळाबद्दल प्रेम पाहिलंत का?

दरम्यान, स्वप्निलने कॅमेरामनची मदत केल्याची कृती पाहताच उपस्थितांमधून कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या कृतीनंतर स्वप्निल जोशी आपल्या टीमसोबत मिळून मिसळून राहत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Tags

follow us