Umesh Kamat: अभिनेता उमेश कामतने दिली ‘ही’ आनंदाची बातमी

प्रेरणा जंगम Umesh Kamat: अभिनेता उमेश कामतच्या (Umesh Kamat) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण उमेश कामत आता हिंदीतही काम करताना दिसणार आहे. उमेश कामत बॉलीवुड (Bollywood) पदार्पण करत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘8 एएम मेट्रो’ (8 AM Metro) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.   View this […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T170728.800

Umesh Kamat

प्रेरणा जंगम

Umesh Kamat: अभिनेता उमेश कामतच्या (Umesh Kamat) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण उमेश कामत आता हिंदीतही काम करताना दिसणार आहे. उमेश कामत बॉलीवुड (Bollywood) पदार्पण करत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘8 एएम मेट्रो’ (8 AM Metro) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.


याविषयी उमेशने सोशल मिडीयाच्या (Social media) माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. या चित्रपटातील कलकारांसोबतचा आनंददायी अनुभव असल्याचं तो या पोस्टमध्ये सांगितले आहे. या चित्रपटात अभिनेता गुलशन देवैया आणि सयामी खेर सोबत उमेश कामत देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सयामी साकारत असलेल्या पात्राच्या पतीची भूमिका उमेश करत आहे.

मेट्रो प्रवास आणि यादरम्यान झालेली मैत्री आणि प्रेम, त्यातील नात्यांचा गुंता हे या चित्रपटाचं कथानक आहे. तेव्हा या चित्रपटातील उमेशचं पात्र कसं बांधलं गेलय आणि त्याचा हिंदीतला डेब्यू कसा राहिल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याआधी उमेशने मराठी मालिका, चित्रपट, नाटक, वेबसिरीज या माध्यमातून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयकौशल्याने तो चाहत्यांचा आवडता आणि लोकप्रिय कलाकार ठरला आहे.

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

तसेच ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजमधून त्याने पत्नी प्रिया बापटसोबत काम केलं. दोघांची रियल लाईफ जोडी ही ऑनस्क्रिन देखील पसंत केली जाते. या वेबसिरीजचे तब्बल तीनही सिझन प्रेक्षकांनी पसंत केले. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकातून उमेशने नाट्यरसिकांचं मनोरंजन केलं. तर ‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेतून तो बऱ्याच वर्षांनी मालिका विश्वात झळकला होता. तेव्हा उमेशचं हिंदीतील हे पदार्पण लक्षवेधी ठरेल का? हे चित्रपट प्रदर्शनानंतर समोर येणार आहे.

Exit mobile version