Actress Chhaya Kadam Award at Pune Film Festival : मागच्या वर्षीपासून ज्यांनी लागोपाठ पुरस्कार सोहळ्यात मनाचे पुरस्कार मिळवले अश्या अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांनी अजून एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. (Pune ) छाया कदम यांच्या स्नो फ्लॉवर साठी त्यांना पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आजपासून दिल्लीत मराठीचा जागर! ९८ व्या साहित्य संमेलनाचा पहिला दिवस, पंतप्रधान करणार उद्घाटन
काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये वैविध्यपूर्ण चित्रपटाचं स्क्रिनिंग, कलाकार दिग्दर्शक यांच्या चर्चा होताना सगळ्यांनी पाहिल्या आणि आज पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये हा खास पुरस्कार सोहळा संपन्न झाला. छाया कदम यांना स्नो फ्लॉवर साठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे.
छाया कदम यांच्या पुरस्कारांचा हा सिलसिला असाच सुरू असून येणाऱ्या काळात त्या अनेक प्रोजेक्ट्स चा महत्त्वपूर्ण भाग असणार असल्याचं कळतंय. कमालीच्या दमदार भूमिका छाया कदम यांनी आजवर साकारल्या आहेत या कामाची पोचपावती म्हणून हा अजून एक महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांनी पटकावला आहे.
स्नो फ्लॉवर कशावर आधारित?
स्नो फ्लॉवर हा मराठी भाषेतील चित्रपट दोन देशांमधील एक हृदयस्पर्शी कथा आहे. जी रशिया आणि कोकण या दोन वेगवेगळ्या संस्कृतींना जोडते. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवळीच्या कोकणाच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित, हा चित्रपट भारतात राहणाऱ्या आजी आणि रशियामध्ये राहणाऱ्या तिच्या नातवामधील ‘अंतर’ दर्शवितो. कोकणातील आश्चर्यकारक समुद्रकिनाऱ्यांपासून ते सायबेरियातील थंड बर्फाच्छादित लँडस्केप्सपर्यंत, चित्रपटात एक विरोधाभासी लँडस्केप सादर केला आहे, जो पात्रांच्या भावनिक गोंधळाचे प्रतिबिंबित करतो.