Download App

Ketaki Chitale: केतकी चितळे पुन्हा चर्चेत, ‘या’ गोष्टीवर आणली बंधनं ?

  • Written By: Last Updated:

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही काहीना काही कारणासाठी कायम चर्चेत असते. बहुदा ती तिच्या सोशल मिडीयावर (Social media) पडखर वक्यव्यांमुळे वादात असते तर कधी सोशल मिडीयावर एखाद्या पोस्टमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा केतकी चितळे सोशल मिडीयावरील कारणासाठीच चर्चेत आलीय. याच सोशल मिडीयावरील वादग्रस्त पोस्टमुळे केतकीवर कारागृहात जाण्याची वेळ आली होती. तरीही केतकीने सोशल मिडीयावर सक्रिय राहत तिचं मत मांडणं सुरुच ठेवल आहे.


केतकी चितळेच्या फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर बंधन घालण्यात आलय. केतकीने नुकतच केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे तिचं फेसबुक अकाउंट लॉक करण्यात आले आहे. तर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही बंधनं घालण्यात आली आहेत. याच विषयी केतकीने पुन्हा एकदा सोशल मिडीयावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.


ती पोस्टमध्ये लिहीले आहे की, ‘माझं फेसबुक खातं लॉक केलं गेलं आहे आणि इन्स्टाग्रामनं माझी ब्रँडेड कंटेन्ट पात्रता काढून टाकली आहे. मेटा पुन्हा पुन्हा रिंग विंग लोकांना कसं बंद करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.’ असं असलं तरी केतकीने तिच्या चाहत्यांना, फॉलोअर्सना तिच्या इतर सक्रिय अकाउंटची माहिती देत तिथे मत व्यक्त करत राहणार असल्याचही पोस्टमध्ये सांगितले आहे.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

“मी अजूनही ट्विटरवर आहे. हँडल आहे: विकिची, युट्यूब वर: epilepsy_warrior_queen आणि एक नवीन चॅनेल ‘Let’s Tallk’ तसंच Spotify, Google, Amazon वर माझे पॉडकास्ट: केल्फीगर्लसोबत जीवन जगणे हे आहे.’ केतकीनं पुढं लिहिलं आहे की, ‘ आणि बहुधा मी लवकरच इतर सोशल मीडियावर येईन किंवा माझी स्वतःची वेबसाइट सुरू करेन जिथं मी खऱ्या गोष्टींचा उलगडा करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us