नागिन फेम अभिनेत्रीच्या बहिणीची इस्रायलमध्ये दहशतवाद्यांकडून हत्या

Israel-Palestine Conflict : टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायक हिच्यावर (Madhura Nayak) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच मधुराने चाहत्यांशी सोशल मीडियातून संवाद साधला आहे. तिने इस्रायल-हमास युद्धात कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. व्हिडिओमध्ये मधुरा इस्रायलला पाठिंबा देत असून तिचे कुटुंब गमावल्याचे दुःख व्यक्त करत आहे. मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप […]

Madhura Nayak

Madhura Nayak

Israel-Palestine Conflict : टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायक हिच्यावर (Madhura Nayak) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच मधुराने चाहत्यांशी सोशल मीडियातून संवाद साधला आहे. तिने इस्रायल-हमास युद्धात कुटुंबातील सदस्य गमावले आहेत.

व्हिडिओमध्ये मधुरा इस्रायलला पाठिंबा देत असून तिचे कुटुंब गमावल्याचे दुःख व्यक्त करत आहे. मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूप भावूक झाल्याचे दिसून येते. म्हणाली – ‘मी मधुरा नायक आहे, भारतात जन्मलेली ज्यू. आम्ही फक्त 3000 लोक भारतात आहेत. 7 ऑक्टोबरपूर्वी आम्ही आमच्या कुटुंबातील एक मुलगी आणि एक मुलगा गमावला आहे.

मधुरा नायक म्हणाली, माझी बहीण ओडाया आणि तिचा नवरा मारला गेला आहे, तोही त्यांच्या दोन मुलांसमोर… माझ्या कुटुंबाला या वेळी ज्या वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे ते शब्दात मांडता येणार नाही. आज इस्रायल दुखात आहे, हमासच्या आगीत लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध जळत आहेत.

मधुरा पुढे म्हणाली, ‘महिला, लहान मुले, वृद्ध आणि अशक्त यांना लक्ष्य करण्यात आले. काल मी माझी बहीण आणि तिचा नवरा आणि मुलांचा फोटो शेअर केला होता. जेणेकरून जगाला आमची वेदना कळू शकेल. पॅलेस्टिनी लोक कसा प्रॉपेगेंडा करत आहेत हे पाहून मला धक्का बसला. मला सांगायचे आहे की या पॅलेस्टाईन समर्थक प्रॉपेगेंडामुळे इस्रायली लोकांना मारेकरी दाखवायचे आहे. हे योग्य नाही. ‘स्वत:चा बचाव करणे म्हणजे दहशत नाही’.

Exit mobile version