Actress Monica Bedi : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉनच्या जाळ्यात अडकल्या. ज्यामुळे यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री अचानक गायब झाल्या. (Love) असंच काही अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासोबत देखील झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या अबू सलेम याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या मोनिका हिला तब्बल 5 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.
अबू सलेम आणि मोनिका यांचा पहिली भेट दुबईत एक इव्हेंट दरम्यान सांगितली होती. तेव्हा अबू सलेम याने अभिनेत्रीला स्वतःची ओळख उद्योजक म्हणून करुन दिली होती. मोनिकाच्या सौंदर्यावर सलेम पूर्णपणे फिदा झाला होता. या दरम्यान दोघांमध्ये संपर्क देखील वाढला होता. दुबईतून मुंबईत आल्यानंतर सलेम मला सतत फोन करत राहायचा. फोनवर बोलत असतानाच आमच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
मोदी जॅकेटनंतर आता मोदीहार समोर; अभिनेत्री रुची गुर्जरने गळ्यात घातला पंतप्रधान मोदींचा फोटो नेकलेस
आम्ही एकमेकांवर प्रेम करु लागलेलो. त्याला भेटण्यासाठी मी दुबईत देखील गेली. त्याने मला त्याचं नाव अबू सलेम असल्याचं सांगितलं होतं. हे नाव मी पूर्वी कधी ऐकलं देखील नव्हतं. त्याची दुसरी आणि भयानक बाजू मला माहिती नव्हती. आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतीत करायला लागलो होतो. एकत्र डिनरला जायचो. सिनेमा पाहण्यासाठी जायचो. तो माझी प्रचंड काळजी घ्यायचा. त्याचा स्वभाव देखील फार चांगला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक काही जाणून घ्यायची गरज मला वाटली नाही.
पुढे हळू हळू मला कळू लागलं होतं की, सलेम पॉवरफुल आहे. त्याच्या आजू-बाजूला गार्ड्स असायचे. काही दिवसांनंतर तो अमेरिकेत गेला. त्यानंतर त्याने मला देखील अमेरिकेत बोलावून घेतलं. अमेरिकेत गेल्यानंतर मला कळलं की, मी परत येवू शकत नाही. पोलिसांना माहिती होतं की, अबू सलेम एका अभिनेत्रीसोबत राहत आहे. त्याला भीती होती की पोलीस माझ्यावर दबाव टाकतील आणि त्याच्यापर्यंत पोहोचतील.
मी अनेकदा स्वतःला त्याच्या तवडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण मला यश मिळालं नाही. तो पुन्हा मला हॉटेलच्या रुममध्ये घेवून गेला. लोकांना वाटायचं मी अबू सलेम याच्यासोबत आहे आणि राजकुमारीसारखं आयुष्य जगत आहेत. पण असं काही नव्हतं. मी त्याच्यासाठी साफ-सफाई केली आहे. मी त्याच्यासाठी धुणीभांडी केली आहेत. स्वयंपाक देखील बनवला आहे. असं देखील अभिनेत्री मोनिका बेदी म्हणाली.