Nivedita Saraf Post: निवेदिता सराफ यांनी मामांसाठी लिहलेली पोस्ट चर्चेत, “माय डार्लिंग, तू…,”

Nivedita Saraf Post: मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. गेल्या अनेक वर्षात ते त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहेत. सर्व कलाकारांचं त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. सोशल मीडियावरून (Social media) त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.   View this […]

Letsupp Image (42)

Nivedita Saraf Post

Nivedita Saraf Post: मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. गेल्या अनेक वर्षात ते त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहेत. सर्व कलाकारांचं त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. सोशल मीडियावरून (Social media) त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.


अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबरचे वेगेवेगळे फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच त्यांची बायको निवेदिता सराफ (Nivedita Saraf ) यांनी देखील त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मामांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. त्यांनी आणि मामानी आत्तापर्यंत अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहेत.

अनेकवेळा ते एकमेकांविषयी वाटणारा प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. तर काल रात्री निवेदिता सराफ यांनी मामांसाठी वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी त्यांचा आणि मामांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “हॅपी बर्थडे माय डार्लिंग… मी खूप भाग्यवान आहे की तू माझा जोडीदार आहेस.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

तू माझा मित्र आहेस, माझा मार्गदर्शक आहेस, तू सगळं काही आहेस. लव्ह यू.” आता त्यांची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आली आहे. निवेदिता सराफ यांच्या या पोस्टवर मामा आणि निवेदिता सराफ यांचे चाहते आणि त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीं मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत मामांना वाढदिवसाच्या खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version