Download App

ॲक्शन फिल्म ‘अल्फा’ची शूटिंग झाली सुरू; अभिनेत्री शर्वरी वाघ आलिया भट्टसोबत पडद्यावर झळकणार

अभिनेत्री शर्वरी वाघने तिची भूमिका असलेला आगामी 'अल्फा' या ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अलिया भट्टसोबत झळकणार

  • Written By: Last Updated:

Actress Sharwari Wagh : अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या आगामी ‘अल्फा’ या ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात ती बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्टसोबत दिसणार आहे. शर्वरीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या भावना उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, ‘यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही! (Actress Sharwari) आज माझा अल्फा प्रवास सुरू होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, या क्षणासाठी मी खूप तयारी केली आहे. आदि सर, तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद’अल्फा’ हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या विश्वाचा एक भाग आहे आणि त्यातून खूप अपेक्षा केल्या जातत असही ती म्हणाली आहे.

‘ओडेला 2’ मध्ये तमन्ना भाटिया 800 कलाकारांसह क्लायमॅक्स करणार शूट, कुठ होणार शूटिंग?

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्रीने नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचं वेळोवेळी दिसत आहे. तीला अनेक नकारांचाही सामना करावा लागला आहे. आज ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांना खूश करताना दिसत आहे. शर्वरीने या चित्रपटासाटी फिटनेसची मोठी काळजी घेतली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सरू आहे. शर्वरी वाघ नुकतीच ‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहत्यांनी भरभरून कौतुक कंल होतं.

follow us