Raj Kundra: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं ‘ते’ ट्वीट व्हायरल; म्हणाला, ‘आम्ही वेगळे झालोय…’

Raj Kundra Post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) त्याच्या नवीन सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography Case) राज कुंद्राला तुरुंगवास भोगावा लागला होता. जामिनावर सुटल्यानंतर आता राज कुंद्राने त्याच्या आयुष्यावरच सिनेमा काढला आहे. तसंच यामध्ये त्याने स्वत:च काम केलं आहे. आता नुकतंच राज कुंद्राचं […]

Shilpa Shetty अन् राज कुंद्रावरील फसवणुकीच्या आरोपावर वकीलाचं स्पष्टीकरण, म्हणाले...

Shilpa Shetty

Raj Kundra Post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) त्याच्या नवीन सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography Case) राज कुंद्राला तुरुंगवास भोगावा लागला होता. जामिनावर सुटल्यानंतर आता राज कुंद्राने त्याच्या आयुष्यावरच सिनेमा काढला आहे. तसंच यामध्ये त्याने स्वत:च काम केलं आहे. आता नुकतंच राज कुंद्राचं एक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.


काल रात्री १ वाजता राज कुंद्राने ट्वीट करत लिहिले आहे की,’ आम्ही वेगळे झालोय आणि कठीण प्रसंगी आम्हाला वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे.’ या ट्वीटनंतर आता चाहते वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्याने ट्वीटमध्ये एक हार्टब्रेक इमोजी देखील टाकला आहे. यामुळे खरंच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी वेगळे होत आहेत का? त्यांचा घटस्फोट होतोय का अशा चर्चा सध्या रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच राजचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगितले जात आहे.

जामिनावर बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा कायम मास्क घालून फिरत असल्याचे बघायला मिळत होत. त्याने कधीच आपला चेहरा दाखवला नाही. तर आता सिनेमाच्या निमित्ताने त्याने पुन्हा आपला चेहरा माध्यमांसमोर दाखवला आहे. यामुळे मास्कपासून वेगळं झाल्याचं हे ट्वीट असू शकतं असा अंदाज चाहते बांधत आहेत. शिल्पा शेट्टी या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्राच्या सोबतीने उभी होती. त्यामुळे आता त्यांच्यात सगळं आलबेल असल्याचे बघायला मिळत आहे. आता या ट्वीटचा नेमका अर्थ काय आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Tiger Nageshwar Rao: ‘या अनोख्या कथेचा एक भाग..’, अनुपम खेर यांनी सांगितलं यामागचं गुपित

राज कुंद्रा लवकरच त्याच्या ‘यूटी 69’ (UT 69) या सिनेमात लवकरच बघायला मिळणार आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा चर्चेत आला होता. परंतु आता अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तो सज्ज आहे. त्याच्या ‘यूटी 69’ या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर शेअर करत राजने लिहिलं होतं,”माझं आयुष्य रोलर कोस्टरसारखं होतं. त्याचा एक भाग तुमच्यासोबत शेअर करत आहे”. तर शिल्पानेही या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला होता. ट्रेलर शेअर करत तिने लिहिलं होतं,”कुकी..खूप खूप शुभेच्छा…तू एक धाडसी व्यक्ती असून मला तुझं खूप कौतुक वाटतं”. ‘यूटी 69’ हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Exit mobile version